शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालक आर्थिक अडचणीत ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

अभाविपचे विविध महाविद्यालयांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर अनेकांचा रोजगार बुडाला. परिणामी, ...

अभाविपचे विविध महाविद्यालयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर अनेकांचा रोजगार बुडाला. परिणामी, पालक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकत असताना, त्यात पाल्याचे शैक्षणिक शुल्क कसे भरणार ही चिंता आता पालकांना सतावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी शहरातील विविध महाविद्यालयांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या शिष्टमंडळाने आय.एम.आर. महाविद्यालय, रायसोनी महाविद्यालय, एस.एस.बी.टी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेतली. नंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या प्राचार्यांसमोर मांडल्या. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे. याचा परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे व ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही, अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्‍यात आली.

विद्यार्थ्यांनी अडचणी मांडल्यानंतर स्वीकारले निवेदन

आय.एम.आर. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयीन शुल्कात कपात करून महाविद्यालय चालवायचे कसे, असा प्रश्न विचारत कुठलीही कपात करणे शक्य नाही, असे विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांनी संपूर्ण अडचणी प्राचार्यांना सांगितल्या. काहींना अश्रू अनावर झाले. त्यानंतर प्राचार्यांनी निवेदन स्वीकारले. कुठलाही विद्यार्थी महाविद्यालयीन शुल्कामुळे परीक्षेपासून वंचित राहता कामा नाही, अशी मागणी अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील यांनी महाविद्यालयाकडे केली.

रायसोनीने केले पन्नास टक्के कपात

रायसोनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतल्यानंतर परीक्षा शुल्कात पन्नास टक्के शुल्क माफ केल्याची माहिती अभाविपला देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. तसेच कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या परिवारातील सदस्य दगावले असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून याअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करावे, अशीही मागणी करण्‍यात आली. महाविद्यालयांना निवेदन देताना, अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, नगर मंत्री आदित्य नायर, संकेत सोनवणे, अभिषेक खोपुल, दीपक बाविस्कर, यश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.