शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला आंधळ्या प्रेमापुढे पालकही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:41 IST

जामनेर , जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, जामनेर तालुक्यात घडली. चार दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्देलग्न करुनच त्यांनी गाठले जामनेरजन्मदात्या आईने मुलीपुढे टेकले हातपोलीस ठाण्यात रडली ती ढसाढसा

जामनेर, जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, जामनेर तालुक्यात घडली. चार दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. मंगळवारी ती तरुणी एका तरुणासोबत मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे विवाह करुनच पोलीस ठाण्यात दाखल झाली.हे तरुण-तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री वाढली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाने त्यांना थेट विवाह बंधनातच अडकवले. विशेष म्हणजे हे तरुण तरुणी भिन्न जाती धर्माचे असूनही त्यांनी एकमेकांसोबत सात जन्म राहण्याचा आणा भाका घेतल्या.मुलीकडच्या अन् मुला कडच्या मंडळींनी या प्रेमवीरांना समजावण्याच्या आटोकाट प्रयत्न केला. मुुलीची आई अक्षरश: ढसाढसा रडत रडत पाय धरुन बेटा तू घरी चल, अशी विनंती करीत होती. वडील, भाऊ, बहीण, नातेवाईकांनी हात पाय जोडले. समाजबांधव गोळा झाले. मात्र तरुणी बेधुंद झाली होती. ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर मुलगा-मुलगी सज्ञान असल्याने पोलीस व कुटुंबयदेखील हतबल झाले. अखेर ती तरुणी त्या तरूणाच्या घरी नांदायला गेली.खरंच प्रेम आंधळं असते?ज्यांनी त्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले ज्याच्या पायाखाली स्वर्ग आहे ते म्हणजे आई आपल्या मुलीच्या पाया धरुन ढसाढसा अर्धा तास रडली, बेटा तू घरी चल, तरी त्या मुलीला जन्मदात्या आईची दया आली नाही. ती कठोर झाली. आपल्या काही दिवसांच्या प्रेमामुळे त्यामुळे खरंच प्रेम आंधळं असतं याचा प्रत्यय आला.मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. आज रोजी त्या दोघे बºहाणपूर येथे लग्न करून आले. त्यांचे जाबजवाब नोंदवण्यात आले. मुलीने आई वडिलांकडे जाण्यास नकार दिला. ते सज्ञान असल्यामुळे ती त्या मुलासोबत निघून गेली.- प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJamnerजामनेर