पुण्याची एक साडेसतरा वर्षांच्या तरुणीची अमळनेरच्या एका तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आणि ती त्याच्या प्रेमात पडली. प्रेम इतके उतावीळ झाले होते की, तरुणीने आई-वडिलांचा विचार न करता पुणे सोडले. तरुणी धुळे पोलिसांना आढळून आली. चौकशी केली असता प्रेम प्रकरण समोर आले. पोलिसांनी तिला कायद्याचे ज्ञान देऊन तू अल्पवयीन असल्याने तुझे लग्न लावू शकत नाही, असे सांगून तिच्या वडिलांना बोलावून तिला दोन दिवस बाल सुधार गृहात पाठवले. तेथे मत परिवर्तन झाले म्हणून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांनी पुन्हा तिचा मार्ग चुकू नये म्हणून तिच्याकडून मोबाइल जप्त केला. मात्र, ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणत त्या तरुणीने पुन्हा पळ काढून प्रियकराचे अमळनेरचे घर गाठले. पुन्हा पालक तिला घ्यायला आले. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तरुण आणि तरुणीला
कायद्याची समज दिली अन्यथा गुन्हे दाखल होतील, याची जाणीव करून ज्याच्या त्याच्या घरी जाण्यासाठी समजावले. अखेर हतबल झालेले वडील मुलीला रात्री आपल्यासोबत घेऊन पुण्याला निघाले. केविलवाण्या चेहऱ्याने मुलीचा बाप असल्याचे दुःख मनात ठेवत निघून गेला.
- संजय पाटील, अमळनेर.