शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाचो:यात युती नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:34 IST

आर.ओ. पाटील यांची स्पष्टोक्ती : शिवसेना मेळावा

पाचोरा :  जळगाव जिल्ह्यात भाजपाशी युती नाही, आणि पाचो:यात तर ती कदापिही होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी रविवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.   आगामी जि.प.- पं.स. निवडणुकीच्या  पाश्र्वभूमीवर पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिका:यांचा  मेळावा महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला मोठय़ा संख्येने शिवसैनिक हजर होते.  यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा- भडगाव मतदारसंघात विकासकामे झपाटय़ाने होत असून शिवसैनिक हा हाडाचा कार्यकर्ता आहे. यामुळे विकास हाच शिवसेनेचा अजेंडा असून  दोन्ही तालुक्यातून जि.प.-पं.स. च्या जागांवर  भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.  आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, सरकारमध्ये सहभागी असलो तरी विरोधी व सत्ताधारी पक्ष अशी दुहेरी भूमिका शिवसेनेला पार पाडावी लागत आहे. कारण राज्यात मजबूत विरोधी पक्षच शिल्लक नाही.  काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्याच्ंया कुंडल्या मुख्यमंत्र्यांना माहीत असून सरकारपुढे विरोधी पक्ष नामोहरम होतो.  यावेळी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा परिणाम काय झाला, याबाबतचा खरपूस समाचार आमदार पाटील यांनी घेतला.  मेळाव्यात अरुण पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश सोमवंशी, गणेश परदेशी यांचीही भाषणे झाली.  प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पाचोरा -भडगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी , भाजपा कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला.  मेळाव्याला दीपक राजपूत, ज्ञानेश्वर सोनार, नगराध्यक्ष संजय गोहील,  उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, उध्दव मराठे, डॉ.एल.टी.पाटील, युवराज पाटील, डॉ.भरत पाटील,  दिनकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार दीपक राजपूत यांनी मानले. (वार्ताहर)पाचोरा पीपल्स बँक संचालकांना खावी लागणार जेलची हवा 4पाचोरा पीपल्स बँकेत भ्रष्टाचार व हुकूमशाही आहे, यामुळे मनात आणले तर  सहा महिन्यात या बँकेच्या संचालकांना जेलची हवा खावी लागेल, असा गर्भित इशाराही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान या विधानाबाबत पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अशोक संघवी यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले की, सभासदांनी आमच्या प्रामाणिकपणामुळे पूर्ण बहुमत दिले. आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा बँकेत सुरु असलेल्या व्यवहारांबाबत अधिक लक्ष घालावे. ते पराभव पचवू शकले नाही, यामुळेच ते असे आरोप करीत आहेत, असेही संघवी यांनी              स्पष्ट केले.