शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

फर्दापूर तांडा येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:39 IST

कल्पवृक्ष कलशाकार तीर्थावर कल्पवृक्षनंदीजी महाराजांना आचार्य पद बहाल

ठळक मुद्देअजिंठा लेणीपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेले हे तीर्थ देशभरातील जैन समाजासाठी श्रद्धास्थळ ठरणार आहे.सकाळी ९ वाजेपासून सुरु होणारा प्रतिष्ठा महोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.हत्ती, घोडे, उंट, धार्मिक साहित्य विक्री करणारे स्टॉल यामुळे परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे.

आॅनलाईन लोकमतवाकोद ता.जामनेर,दि.९ - वाकोद येथून जवळच असलेल्या फदार्पूर तांडा येथील कल्पवृक्ष कलशाकार जैन तीर्थावर ३ डिसेंबर पासून सुरु असलेल्या भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा, विश्वशांती महायज्ञ व गजरथ महोत्सवात शनिवारी तिर्थाचे प्रणेते बालाचार्य श्री १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांना आचार्य पद बहाल करण्यात आले.यावेळी कल्प वृक्षनंदीजींचे गुरुआचार्य १०८ दर्शनसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत कल्पवृक्षनंदी महाराज यांचे केस लोचन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पदवीदान सोहळा पार पडला. कल्पवृक्ष कलशाकार तीर्थावर सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात जन्मकल्याणक सोहळा झाला. आसाम, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व राज्याच्या विविध भागातून जैन समाज बांधव उपस्थित होते.या सोहळ्यासाठी धर्मकेसरी आचार्य श्री १०८ दर्शनसागर महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात महाराष्ट्रातील पहिल्या अशा नवग्रह मंदिरात देवतांची प्रतिष्ठा होत आहे. कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे गुरु आचार्य श्री दर्शनसागरजी महाराज, सुसनेर (मध्यप्रदेश) यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याणक सोहळा पार पडत आहे. रविवारपर्यंत चालणाºया या प्रतिष्ठा महोत्सवाला समाज बांधवानी उपस्थित रहावे आसे आवाहन महोत्सव समितीने केले आहे. यशस्वीतेसाठी ब्रम्हचारिणी सपना दीदीसह महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल बंडी - मुंबई, कार्याध्यक्ष धन्यकुमार जैन - जळगाव, आर.के. जैन, महामंत्री मनोज छाबडा - तोंडापूर, गणेश डेरेकर, महावीर सैतवाल- जळगाव, सतिष साखरे, रमेश अन्नदाते, मोहन जैन, राजेंद्र जैन - पिंपळगाव (हरे.), जितू जैन परिश्रम घेत आहेत.