शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा भरतीत घोळ

By admin | Updated: April 15, 2017 00:36 IST

आयुक्तांच्या मंजुरीनंतरही खाडाखोड : लिपिकाला बडतर्फीची नोटीस

जळगाव : मनपात अनुकंपा तत्वावर भरावयाच्या जागांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीला ऊत आला असून 16 जणांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात आले आहेत.                            दरम्यान आयुक्त, उपायुक्तांच्या मंजुरीनंतर आदेशात खाडाखोड             करून  नियुक्तीचे पद बदलणा:या आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिकाला उपायुक्तांनी आयुक्तांच्या सूचनेवरून बडतर्फीची नोटीस बजावली आहे. मनपा आस्थापना विभागात कर्मचा:यांच्या अडवणुकीचे व त्यांच्याकडून कामांसाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागलेले असून वरिष्ठांकडे टिपणी ठेवण्यासाठी देखील कर्मचा:यांकडून पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र काम अडलेले असल्याने जाहीरपणे बोलण्याचे  धाडस मनपा कर्मचा:यांना होत नसल्याचे चित्र आहेत. त्यातच अनुकंपा तत्वावर पदे भरण्यासाठीही मयत कर्मचा:यांच्या वारसांचे मनपात सातत्याने हेलपाटे सुरूच आहेत. रिक्त पदांच्या 10 टक्के पद अनुकंपाने भरण्याचा शासन निर्णय आहे. तर अनुकंपाची यादी मोठी आहे. त्यापैकी यादीतील पहिल्या 16 वारसांना अनुकंपाने नियुक्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यातही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप होत आहे. नियम डावलल्याने नोटीसमनपातील कनिष्ठ अभियंता असलेल्या एका अधिका:याचा सेवाकाळातच मृत्यू झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला नियुक्ती देण्यात येणार आहे. अनुकंपाच्या यादीतील क्रमानुसारच नियुक्ती दिली जाणार असली तरी त्यातही तब्बल 7 लाखांचा व्यवहार झाल्याची उघड चर्चा मनपा वतरुळात सुरू आहे. त्यात दोन आजी-माजी नगरसेवकही सहभागी असल्याचे बोलले जात आहे. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही वारसाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिली जाते. मात्र त्यातही चतुर्थश्रेणीच्या पदावर अथवा वर्ग 3 मधील निम्नपदावरच देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ही नियुक्ती आरेखक या वर्ग तीनच्या श्रेणीतील निमA पदावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या टिपणीस आयुक्त, उपायुक्तांनी मंजुरीही दिली होती. मात्र नंतर आस्थापना विभागात त्यात खाडाखोड करून आरेखक ऐवजी रचना सहाय्यक या वर्ग 3 श्रेणीतील उच्च पदावर नियुक्ती देण्याचा बदल करण्यात आला. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आल्याने त्यांच्या आदेशावरून उपायुक्तांनी आस्थापना विभागातील संबंधीत लिपिक सोनवणे यांना गुरूवार, 13 रोजी बडतर्फीची नोटीस बजावली असून तीन दिवसांत खुलासा मागविला आहे. त्यानंतर याप्रकारात या विभागातील आणखी कोण-कोण सहभागी आहेत? ते उघड होणार आहे.