गोगडी शिवारात बाबूराव नामदेव उबाळे यांचे ८३७/ अ गट क्रमांकात शेत आहे. यात कपाशी व मिरची लागवड करण्यात आली. दि. १८ रोजी शेतातील चारशे कपाशीची झाडे अज्ञातांनी उपटून फेकली. याबाबत पहूर पोलीस ठाण्याला तक्रारअर्ज दाखल केला आहे. घटनेला आठ दिवस उलटत नाही, तोच गुरुवारी सकाळी पुन्हा मिरचीची पन्नास झाडे उपटून फेकली. याबरोबरच पाईप, काॅक तोडलेल्या स्थितीत शरद उबाळे यांना आढळले.
विशेष म्हणजे शेतात अवैध दारूच्या फुग्याच्या पिशव्या निदर्शनास आल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांत तक्रार देऊनही आमची दखल घेतली जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया बाबूराव उबाळे यांनी व्यक्त केली.
290721\29jal_3_29072021_12.jpg
पहूर येथील शेतकऱ्याच्या शेतातील अज्ञातांनी उपटून फेकलेली कपाशी व मिरचीचे झाडे.