शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा पीपल्स बँकेचे मु. का. अधिकारी निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:11 IST

आरोप : कारवाई आहे बेकायदेशीर

पाचोरा : दि पाचोरा पीपल्स को. आॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्यावर प्रशासकांनी ठपके ठेवत निलंबनाची कारवाई केली. ही माहिती प्रशासकांनी बँकेच्या कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.बँकेचे अशासकीय प्रशासक अ‍ॅड. प्रशांत कुलकर्णी व सीए प्रशांत अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून १ कोटी ४८ लाख नफा यावर्षी राजकीय घडामोडीनंत बँकेस मिळाला आहे. ठेवीदारांसाठी व्याजदर वाढवले असून थकीत कर्जवसुलीची मोहीमही जोरात सुरू आहे.दरम्यान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांनी कर्जवाटप चुकीच्या पद्धतीने करून नियमबाह्य कामे केल्याचे दिसत आहे. कर्जवसुलीत बाधा आणून बँकेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. चेक डिस्काउंट , कर्जप्रकरणात त्रुटी ठेवणे, गोडाऊन लोन प्रकरणी अनियमितता असणे या कारणाने टिल्लू यांची चौकाशी पूर्ण होईपावेतो त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दरम्यान सदर निलंबन प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांचेशी संपर्क साधला असता माझी नियुक्ती ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाने असून प्रशासकांनी केलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असुन माझे कामकाज नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.