शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच

By admin | Updated: March 19, 2017 00:59 IST

महसूलमंत्र्यांकडे महापौरांचा दावा: दोघं आमदारांची उपस्थिती, न्यायालयात जाण्याची पालिकेची भूमिका

जळगाव : महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा ही तत्कालीन नगरपालिकाच्या मालकीची असून, या मार्केटप्रश्नी शासनाने तातडीने निर्णय घेऊन पालिका व गाळेधारक यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महापौर नितीन लढ्ढा यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान केली. यातच फुले मार्केटच्या मुद्द्यावर शासनाकडून पालिकेस न्याय न मिळाल्यास पालिका न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौर लढ्ढा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या भेटीदरम्यान आमदार सुरेश भोळे व चंदुलाल पटेलही उपस्थित होते. मंत्रालयात पाटील यांच्या दालनात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. त्यात फुले मार्केटसह हुडको, शिवाजीनगर आणि पिंप्राळा उड्डाणपुलाबाबत निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या. जागेबाबत कागदपत्रे केली सादरफुले मार्केटची जागा शासन किंवा महसूल विभागाची असल्याचा दावा करीत फुले मार्केटप्रश्नी शासनच निर्णय घेईल, असे महसूल विभागाने म्हटले आहे. या मुद्द्यावरून महापौर व महसूलमंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यात महापौर यांनी फुले मार्केटची जागा ही नगरपालिकेचीच असल्याचे काही कागदपत्र सादर केले. फुले मार्केट ज्या सर्वे नंबरमध्ये आहे त्याच सर्वे नंबरमध्ये काँग्रेस भवनच्या जागेचे खरेदीखत १९५५ मध्ये तत्कालीन नगरपालिकेने केले व पालिकेकडे त्यासंबंधीचा भरणा झाला. नंतर १९७५ मध्ये महात्मा फुले मार्केटनजीकच्या महिला मंडळाच्या जागेचे खरेदी खतही तत्कालीन पालिकेने केले. सर्वे नंबरची मालकी असल्याशिवाय खरेदीखत कुठली संस्था करू शकत नसल्याची बाब महापौर लढ्ढा यांनी महसूलमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.  पिंप्राळा व शिवाजीनगर पूल केंद्रीय योजनेत समाविष्ट करा, अशी मागणी महापौर यांनी महसूलमंत्री पाटील यांच्याकडे केली. २८ रोजी मुंबईत बैठकफुले मार्केटच्या जागेच्या मालकीबाबत येत्या २८ रोजी मुंबई येथे महसूल विभागाच्या सचिव व इतर वरिष्ठ अधिकाºयांसोबत बैठक घेतली जाईल. त्यात याबाबत सविस्तर चर्चा होऊन कुठलातरी निर्णय घेण्यापर्यंत विषय पुढे जाऊ शकतो, असे महसूलमंत्री यांनी महापौर यांना सांगितले.