शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखांवर लोकांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ लाखांवर पोहोचली आहे. यात बहुतांश आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ लाखांवर पोहोचली आहे. यात बहुतांश आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्स यांनी दुसरा डोसही घेतला आहे. सद्यस्थिती कोविशिल्ड लसीचे १ लाखांवर डोस शिल्लक असून टप्प्याने ते प्राप्त होत असल्याने साठा पुरेसा असल्याची महािती आरोग्य विभागातून देण्यात आली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीला सुरूवात झाली होती. सुरवातीला महिनाभर याची गती अत्यंत संथ होती. मात्र, हळू हळू याचे प्रमाण वाढत गेले. लसीकरणाचा आता चौथा तिसरा टप्पा सुरू असून लवकरच चौथा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्पयात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

डोसेस पुरेसे

जिल्ह्यात सुरूवातीपासून कोविशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत. यात जिल्ह्याला एकूण २ लाख २३०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १०४४० डोस शिल्ल्क आहेत. तर कोव्हॅक्सीनचे शंभरच डोस शिल्लक आहेत. जळगाव शहरात दोन केंद्रांवर दोन लस उपलब्ध आहेत. दरम्यान, कोविशिल्डचे डोस पुरेसे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

केंद्र वाढविली

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी केंद्र वाढविण्यात येत आहेत. शिवाय जळगाव शहरात महापालिकेची तीन तर जिल्हा रुग्णालयाकडून दोन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. खाासगी रुग्णालयांमनाही परवागनी दिली जात असून सर्व आरोग्यकेंद्रामध्येही लसीकरण सुरू करण्यात आले आहेत.

कोट

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जळगाव शहरात महापालिकेची तीन केंद्र आहेत. यात शाहू महाराज रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस असूनडीबी जैन रुग्णालय आणि नानी बाई रुग्णालयात कोविशिल्डचे डोस उपलब्ध आहेत. लस सुरक्षित असल्याने निकषात बसत असलेल्या नागरिकांनी लस घ्यावी - राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस : २१७२५

दुसरा डोस : ९८६९

फ्रंट लाईन वर्कर

पहिला डोस २३९७८

दुसरा डोस : ४१०६

ज्येष्ठ नागरिक आणि अन्य व्याधी असलेले ४५ वर्षावरील नागरिक

पहिला डोस : ७९१८२