शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

जळगावात सायबर कॅफेच्या ग्राहक सेवा केंद्रात ‘हेराफेरी’ झाल्याने उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 11:57 IST

ग्राहकांचे पैसे खात्यात जमा झालेच नाही

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुलातील 2 दुकाने सीलपोलीस ठाण्यात मध्यस्थी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  ग्राहक सेवा केंद्राच्या नावाखाली ग्राहकांकडून स्वीकारलेले लाखो रुपये त्यांच्या बॅँक खात्यात जमा न करता त्याची हेराफेरी केल्याचा प्रकार जिल्हा क्रीडा संकुलातील कृष्णा सायबर कॅफेत सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी हे कॅफे सील केले असून कॅफे चालक देवेंद्र भालचंद्र धांडे (वय 31, रा. सिंधू नगर, कालिंका माता चौक, जळगाव) याला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील कृष्णा सायबर कॅफेत स्टेट बॅँकेचे मान्यताकृत ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मोहीत जैन यांच्या मालकीचे हे केंद्र असून त्यांच्याकडून देवेंद्र धांडे याने आठ दिवसापूर्वीच भाडे कराराने चालवायला घेतले आहे. या केंद्रात 20 हजार रुपयांच्या आत रक्कम काढणे व जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शनिवारी बॅँकाना सुटी असल्याने 25 ते 30 ग्राहकांनी या केंद्रात येऊन धांडे याच्याकडे पैसे दिले. धांडे याने ते पैसे घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्याही दिल्या, मात्र सोमवार्पयत हे पैसे संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा झालेच नाहीत.पोलीस ठाण्यात मध्यस्थीमोहीत जैन यांच्या दुकानात अन्य व्यवसायासाठी भागीदार असलेले ज्ञानेश्वर राणा यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या चार तक्रारदारांचे 46 हजार रुपये भरण्याची तयारी दर्शविली. सकाळीही त्यांनी काही तरुणांचे 32 हजार रुपये भरले होते. या प्रकरणाशी संबंध नसताना फक्त माणुसकी म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतला. त्यामुळे रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. मंगळवारी अन्य लोकांचे पैसे परत केले नाहीत तर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.या ग्राहकांचा संतापमुकेश वर्मा 12 हजार 500, निलेश वाघ दीड हजार, राहूल संजय ढोले सात हजार व प्रमोद पाटील 25 हजार असे चार जणांचे 46 हजार रुपये धांडे याने घेतले होते. हे चारच तरुण सायंकाळी हजर होते तर अन्य तरुण बाहेरगावचे असल्याने निघून गेले होते.याशिवाय एका जणाचे 1 लाख 80 हजार रुपये घेतले असून अन्य 20 ते 22 जणांचे दोन हजारापासून तर 25 हजारार्पयत रक्कम आहे. यापैकी काही ग्राहकांनी तक्रार केल्याने पोलीस तपास करीत  आहेत. अन् ग्राहकांचा संताप झाला.धांडे याने घेतलेले पैसे जमा होत नसल्याने ग्राहकांनी शनिवारीच त्याला विचारणा केली. सॉफ्टवेअरची अडचण आहे असे सांगून तो वेळ मारुन नेत होता. शनिवारी त्याने सायंकाळर्पयत तांत्रिक कारण देत दिशाभूल केली. रविवारी दुकान बंद असल्याने ग्राहकांनी सोमवारी दुकानात येऊन धांडे याला जाब विचारत पैसे परत मागितले, मात्र हे पैसे मोहीत जैन यांच्याकडे असल्याचे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ग्राहकांचा संताप झाला. त्यातील राहूल ढोले या तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी  खात्री करण्यासाठी उपनिरीक्षक अंगत नेमाने, श्रीकृष्ण पटवर्धन, संदीप पाटील व जयंत चौधरी यांचे पथक फसवणूक झालेल्या तरुणसोबत पाठविले व दुकान सीलची कारवाई केली. अन् दुकान केले सीलपोलिसांनी सायबर कॅफेत येऊन चौकशी केली असता देवेंद्र धांडे हा दिशाभूल करणारी उत्तरे पोलिसांना देत होता. ग्राहकांची जमा झालेली रक्कम मोहीत जैन हे घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तेथूनच जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दुकानाची तपासणी करुन त्यातील पावत्या, ग्राहकांचे बॅँकांचे पासबुक आदी वस्तू जमा करुन दुकानाला सील लावले. मोहीत जैन यांच्या मालकीचे दुसरे दुकानही सील केले. या दुकानातून मात्र असा व्यवहार झालेला नाही. दुकान व ग्राहक सेवा केंद्र माङो असले तरी मी हे दुकान देवेंद्र धांडे याला भाडय़ाने दिलेले आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक झाल्याशी माझा काहीही संबंध नाही. सध्या मी राजस्थानात आहे. -मोहीत जैन, दुकानमालक

ग्राहकांचे पैसे घेतले आहेत, मात्र ते त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आमच्या डिस्ट्रीब्युटर्सकडे ही रक्कम भरली आहे, परंतु ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली की नाही हे तांत्रिक कारणामुळे स्पष्ट झालेले नाही.- देवेंद्र धांडे, दुकानचालक