शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणाच्या रागातून जन्मदात्यांनी केला मुलीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 22:03 IST

तळवेलची घटना : समाजातील मुलाशी लग्नास दिला होता नकार

वरणगाव, ता. भुसावळ : प्रेमप्रकरणास आईवडिलांनी केलेला विरोध हा तळवेल येथील मुलीने न जुमानल्याने जन्मदात्यांनीच आपल्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तळवेल येथील रहिवाशी सुधाकर पाटील यांची मुलगी निकीता हिचे गावातीलच युवक गणेश निवृत्ती राणे याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. ही कुणकुण दिड वर्षापूर्वी लागली होती. त्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुशंगाने गणेश याला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षाही केली होती. तरी सुद्धा गणेशने प्रेम प्रकरण पुन्हा सुरूच ठेवले होते. यास वैतागून या दाम्पत्याने निकिताचा विवाह ती अल्पवयीन असतानाही खामखेडा ता. मुक्ताईनगर येथील मुलासोबत विवाह जुळवला होता. परंतु गणेशला विवाह होऊ द्यायचा नाही म्हणुन त्याने वधुपक्ष व वरपक्षांविरुद्ध बालविवाह कायद्याअंतर्गत भुसावळ न्यायालयात कागदोपत्री अर्ज केला होता. न्यायालयाकडून दोघांना नोटिस देण्यात आली होती. यामुळे हतबल झालेल्या निकिताच्या आईवडिलांनी निकिताची १९ रोजीच्या रात्री झोपेतच गळा आवळून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. निकिताचे शव ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा होत्या. यावरुन लगेच हा मृत्यू संशयास्पद वाटला. शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्याचे लक्षात आल्याने पोलिसी खाक्या दाखवताच सर्व माहिती २१ रोजी पुढे आली.या प्रकरणी सुधाकर मधुकर पाटील (वय ४६) व नंदाबाई सुधाकर पाटील (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप बोरसे, पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहे .