शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओटीपी क्रमांक विचारुन प्राचार्यांना दीड लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:14 IST

आॅनलाईन फसवणूक : सायबर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : प्राईम कार्डचे वार्षिक शुल्क परत करण्याच्या नावाखाली एटीएम व डेबीट कार्डचा ओटीपी व १६ अंकी क्रमांक विचारुन अजय ओंकारनाथ दहाड (४८, रा.द्रौपदी नगर, जळगाव) यांना एका ठगाने १ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दहाड हे चांदवड, जि.नाशिक येथे खासगी शाळेत प्राचार्य आहेत. तेथेच स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत त्यांचे बचत खाते आहे. २३ मार्च रोजी जळगावात घरी असताना दुपारी दोन वाजता त्यांना एका ठगाने फोन करुन प्राईम कार्डचे ३ हजार ५३९ रुपये परत करावयाचे असल्याने त्यासाठी क्रेडीट कार्ड १६ अंकी क्रमांक व ओटीपी क्रमांक विचारला.दहाड यांनी त्यावर विश्वास ठेवून क्रमांक सांगितला असता लगेच अनुक्रमे १लाख २४ हजार ९००, ३९ हजार ९०० व २ हजार असे एकूण १ लाख ६६ हजार ८०० रुपयांची आॅनलाईन खरेदी केली.युनिकॉर्न इन्फोसोल्युशन प्रा.नवी दिल्ली या खात्यावर हे पैसे वर्ग झाल्याचे बॅँक स्टेटमेंटमधून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.ब्रोकरलाही ४० हजारात फसविलेनागेश्वर कॉलनीतील ब्रोकर योगेश सदानंद अहिरराव यांनाही ४० हजार १८८ रुपयांना गंडविण्यात आले आहे. १० मार्च रोजी ठगाने तीन आॅनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून आठ वेळा आॅनलाईन पैसे हस्तांतर करण्यात आले आहेत. १० हजार, सहा वेळा २ हजार व एक वेळा १८ हजार १८८ रुपये वळविण्यात आले. महाबळमधील स्टेट बॅँक शाखेतून ठोस माहिती न मिळाल्याने अहिरराव यांनी बुधवारी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी