शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा प्रवेश होईल रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे. त्याच पत्त्यावर गुगल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे. त्याच पत्त्यावर गुगल लोकेशन मध्‍ये रेड बलून दर्शविणे आवश्यक आहे. लोकेशन आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्‍ये तफावत आढळून आल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करण्‍यात येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना करण्‍यात आल्या आहेत.

आरटीईतंर्गत आर्थिक दृर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्यील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जात असतो. त्यासाठी दरवर्षी आरटीईची प्रवेश पक्रिया राबविली जात असते. यंदा ३ मार्चपासून आरटीईच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. ७ एप्रिल रोजी पुण्यातून ऑनलाईन सोडत देखील काढण्‍यात आली. त्यात किती विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे. याच दिवसापासून पालकांना त्यांच्या प्रवेशाबाबतचे संदेश सुध्दा पाठविण्‍यात येणार आहे.

पाल्यास सोबत घेवून जावू नये

सोडत जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाने पालकांसाठी आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यात पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता. पोर्टलवर सुध्दा कधी पाल्याचा प्रवेश घ्यावयाचा आहे, याची तपासणी करावी. पोर्टलवर प्रवेशाची तारीख दर्शविली गेल्यानंतर मुदतीत पालकांनी कागदपत्र पडताळणी समितीकडे जावयाचे आहे. मात्र, त्याठिकाणी पालकांनी गर्दी करू नये व सोबत पाल्यांना घेवून जावू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने केले आहे.

तर...पडताळणी समितीला साधा सपंर्क

पालकांनी पडताळणी समितीकडे जाताना प्रवेशाची संपूर्ण कागदपत्रे व आरटीई पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे सादर करावयाचे आहे. तसेच एकाच पालकांनी दोन अर्ज करून लॉटरी मिळविली असेल, त्यांचा सुध्दा प्रवेश रद्द करण्‍यात येणार आहे. दुसरीकडे निवड यादीतील बालकांना पालकांना लॉकडाउनमुळे किंवा अन्‍य कारणामुळे पडताळणी समितीकडे जावून प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल, त्यांनी पडताळणी समितीची संपर्क साधून त्यांच्याकडे ई-मेल, व्हॉटसॲपद्वारे कागदपत्र पाठवून पडताळणी करून घेण्‍याचाही सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.