शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ओरियन, झांबरे विद्यालय उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या जैन चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि ए. टी. झांबरे विद्यालयाने उपांत्य फेरी गाठली आहे.  अनुभूती स्कूलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने प्रोग्रेसिव्ह स्कूलचा ८९ धावांनी पराभव केला. ओरियन स्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ ...

ठळक मुद्देजैन चॅलेज चषक : हर्षवर्धन मालू आणि आतिक तडवी सामनावीरहर्षवर्धन मालू याने बाद केले चार गडीझांबरे विद्यालयाच्या तेजस कोळीचे पाच गडी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या जैन चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ओरियन इंग्लिश स्कूल आणि ए. टी. झांबरे विद्यालयाने उपांत्य फेरी गाठली आहे.  अनुभूती स्कूलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने प्रोग्रेसिव्ह स्कूलचा ८९ धावांनी पराभव केला. ओरियन स्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत ९ गडी बाद १३४ धावा केल्या. गोविंद निंभोरे याने ४० धावांचे योगदान दिले. तर आदित्य विसपुते याने २२ आणि हर्षवर्धन मालू याने १७ धावांचे योगदान दिले. प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या रितेश खडसे याने ३ बळी घेतले. तर ध्रुव पाटील आणि प्रथमेश साळुंखे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नरेंद्र पाटील आणि साहिल शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. रितेश खडसे याने भेदक मारा केला. मात्र त्याच्या प्रयत्नांना इतर गोलंदाजांची फारशी साथ लाभली नाही.प्रत्युत्तरात २५ षटकांत १३५ धावांचे आव्हान असताना प्रोग्रेसिव्ह स्कूलचा संघ १८ षटकांत फक्त ४५ धावा करू शकला. त्यांच्यातर्फे अनिश गायकवाड सर्वाधिक १३ धावा केल्या. ओरियन स्कूलच्या हर्षवर्धन मालू याने ५ षटकांत ८ धावा देत ४ गडी बाद केले. गोविंद निंभोरे याने २ तर आदित्य विसपुते आणि तेजस भालेराव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अन्य सामन्यात ए.टी. झांबरे विद्यालयाने विद्या इंग्लिश स्कूलविरोधात २५ षटकांत ५ गडी बाद १०८ धावा केल्या.  त्यात राधे पवार याने सर्वाधिक ४४ धावा केल्या.  सुमित भगत याने १८ धावांचे योगदान दिले. विद्या स्कूलच्या चेतन मराठे, लोकेश गोयर, तुषार महाजन आणि लोकेश सोनार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात विद्या स्कूलचा संघ ७.२ षटकांत १४ धावातच तंबूत परतला. झांबरे विद्यालयाच्या तेजस कोळी याने ५ गडी तर आतिक तडवी याने ४ गडी बाद केले.