शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘युवारंग’च्या धर्तीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: February 8, 2017 01:01 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवारंग महोत्सव घेण्यात येतो. संशोधनाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर आविष्कार स्पर्धा होतात.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवारंग महोत्सव घेण्यात येतो. संशोधनाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर आविष्कार स्पर्धा होतात. याच धर्तीवर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यातील उत्कृष्ट खेळाडूंसाठी खान्देशस्तरीय क्रीडा महोत्सव घेण्याचे नियोजन असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी.पाटील यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली. तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत खान्देशातील उद्योजकांच्या सहकार्याने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यासाठी औद्योगिक सहकार्य कक्ष  विद्यापीठात स्थापन करून त्यात लघु, मोठय़ा उद्योगांची नोंदणी केली जाणार असल्याचेही कुलगुरू डॉ.पाटील यांनी सांगितले. प्रा.डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’च्या  शहर कार्यालयास मंगळवारी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी त्यांनी तीन महिन्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या विविध योजना, व्हिजन याबाबत मनमोकळा संवाद साधला.प्रश्न- कौशल्य विकास कार्यक्रमांबाबत कुठल्या धोरणावर काम सुरू आहे?प्रा.डॉ.पाटील- विद्याथ्र्याना उपयोगात येईल असे कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे आहेत.  खान्देशातील उद्योजकांच्या सहकार्याने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी जैन इरिगेशन, निर्मल सीड्स यांच्याशी चर्चा सुरू आहे. जमीन ते प्रयोगशाळा ते उद्योग या उपक्रमाला आपण औद्योगिक सहकार्य कक्षाची जोड देऊ. त्यात खान्देशातील सर्व लघु, मध्यम व इतर उद्योगांची नोंदणी केली जाईल. या उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या संदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जाईल. तसेच विद्यापीठाकडे परिषदा व इतर कार्यक्रमांतर्गत येणारे उद्योगांशी संबंधित तज्ज्ञ, अधिकारी खान्देशातील उद्योगांना भेट देऊ शकतील. जे तज्ज्ञ, अभ्यासक उद्योगांना भेटी देण्यासाठी येतील त्यांना विद्यापीठातही विद्याथ्र्याशी संवाद साधण्यासाठी आणले जाईल.