कजगाव, ता. भडगाव : चाळीसगाव तालुक्यातील झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले असता ‘कजगाव येथील केटीवेअरचा भराव गेला वाहून’ या वृत्ताचा लोकमत अंकच त्यांना देण्यात आला.त्यावेळी पाटील यांनी तत्काळ केटीवेअरवरील दोन्ही बाजूला संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
भडगाव पाचोरा मतदारसंघातील गावात तितूर नदीमुळे नदीकाठच्या गावात जवळपास पाचशे हेक्टरच्यावर जमीन वाहून गेली असून, नगरदेवळा पूल दोन्ही बाजूचा भराव,कजगाव येथील केटी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आणि कजगाव गावास नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, याबाबतचे निवेदन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, गोपी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्री जयंत पाटील यांना दिले.
निवेदनासोबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण जोडून देण्यात आले असून त्यावर तत्काळ कार्यवाहीच्या सूचना पाटील यांनी संबंधित विभागास दिल्या.
040921\04jal_9_04092021_12.jpg
जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनासोबत जोडलेले लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताो वाचन करताना जयंत पाटील, माजी आमदार दिलीप वाघ आदी.