शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

18 व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांच्या निष्कासनाचे आदेश

By admin | Updated: July 15, 2017 12:31 IST

ही प्रक्रिया करीत असताना शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांमधील गाळे निष्कासीत (रिकामे) करण्याची प्रक्रिया महापालिकेने 15 दिवसात सुरु करावी व रेडिरेकनरच्या दराने लिलाव करुन गाळे भाडय़ाने द्यावेत, ही प्रक्रिया करीत असताना शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले, अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गाळे 15 दिवसात निष्कासीत करण्यासाठी प्रक्रिया हाती घ्यावीमहापौर लढ्ढा यांनी मनपातील सतराव्या मजल्यावर त्यांच्या दालनात पत्रकारांना सांगितले की, 14 मार्केटबाबत निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, आज व भविष्यातही या मार्केटबाबत वेगळा निर्णय घेता येणार नाही. 15 दिवसात गाळे निष्कासीत करण्याची प्रक्रिया सुरू करावी. रेडिरेकनरच्या दराने त्याची लिलाव प्रक्रिया करुन गाळे भाडय़ाने द्यावेत, ही प्रक्रिया करीत असताना शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये या आदेशांना न्यायालयात शासनाचे वकील अॅड.अमरजितसिंग गिरासे यांनी सहमती दर्शविली, अशी माहितीही लढ्ढा यांनी दिली. विविध याचिकांवर मांडली भूमिकामहापौरांनी सांगितले की, प्रारंभी याप्रश्नी न्यायालयाने कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी ठराव क्रमांक 135 ला स्थगितीची मागणी केली होती. त्या मागणीवर न्यायालयाने आज निर्णय दिला. ही मागणी राजकीय हेतूने असून अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे न्यायालय म्हटले. त्यानंतर हिरालाल पाटील यांच्या मनपाने दिलेली 81 ब ची नोटीस व त्यावर कारवाई न करणे व फुलेमार्केटसह चार मार्केटबाबत वेगळी भूमिका नसावी अशी मागणी याचिकेव्दारे केली होती. या मागणीत व्यापक जनहित असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले.मुंबई उच्च न्यालयात महापालिका व हुडको दरम्यान सुरू असलेल्या कर्जाच्या दाव्याचा संदर्भ न्या. धर्माधिकारी यांनी यावेळी दिला. या कर्जप्रकरणी शासनाने सहानुभूतीने निर्णय घेण्याचेही आम्ही सूचित केले आहे. तरीही हुडकोने 13 जुलै रोजी महापालिकेस 400 कोटींच्या थकबाकी वसुलीबाबत कळविले आहे. त्यामुळे गाळे लिलाव व अन्य प्रक्रियेबाबत मनपा प्रशासनाने 60 दिवसात निर्णय घ्यावा. ठराव 135 बाबत सर्व संबंधितांना असे निर्देश आहेत की, कोणतीही ‘पब्लीक प्रॉपर्टी’ ही विक्री किंवा भाडय़ाने देणे यास लिलावा शिवाय पर्याय नाही, असेही न्यालयाने या निकालात स्पष्ट केले असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा व मनपाचे वकील पी.आर. पाटील यांनी दिली. महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांमधील 2 हजार 175 गाळ्यांचा करार 2012 पासून संपल्यानंतर महापालिकेने मुदत संपलेल्या या व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी तसेच गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीवर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंड आकारणीसाठी महासभेत ठराव केला होता. मनपाच्या या ठराव क्रमांक 40 विरुद्ध व्यापा:यांनी राज्यशासनाकडे दाद मागितली होती. राज्य शासनाने या ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठात चार वेगवेगळया याचिकांवर न्या. सुबोध धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्या बेंचसमोर एकत्रित कामकाज सुरू होते.