शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इंधन विक्री वेळेवरही निर्बंध, संचारबंदीही राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या सोबतच उद्योग, कारखानेही ३० पर्यंत बंदसह इंधन विक्रीच्या वेळीचेही बंधन, संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी राहणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी विविध आदेश जारी केले. यामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करीत पाच पेक्षा अधिक व्यंतींना एकत्र येण्यास बंदी घातली. १५ एप्रिलपर्यंत असणारी ही संचारबंदी आता ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. यासोबतच १४ एप्रिलपर्यंत कारखाने, उद्योग, कंपनी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश डोळे होते, तेदेखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. आजूबाजाच्या जिल्ह्यातील येणारे जाणारे यांची गर्दी होऊन येणारा संपर्क टाळण्यासाठी असलेली सीमाबंदी देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक उपक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांच्यावरही ३० एप्रिलपर्यंत बंदी कायम राहणार आहे. या सोबतच पेट्रोल, डिझेल विक्रीच्या वेळांवर असलेले बंधन देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. असे पाच आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.