शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

गळत्यांचा मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:26 IST

पाणी टंचाई निर्माण झाल्यास मनपाच जबाबदार

ठळक मुद्देसर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?

जळगाव : शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनींना असणाºया गळत्यांचा मुद्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपासह विरोधी शिवसेनेने देखील मनपा प्रशासनाला धारेवर धरले. स्थायी समितीत सर्वच सदस्यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत गळत्यांचा गंभीर प्रश्नाकडे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण होईल व या टंचाईला केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला.अनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मनपाच्या पाईपलाईनीस गळत्या सुरु आहेत. याबाबत ‘लोकमत’ ने दोन दिवसांपासून नागरिकांकडून शहरातील गळत्यांबाबतची माहिती मिळवली असता, शहरात गल्लोगल्लीत असलेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही भवायह स्थिती ‘लोकमत’ ने उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत देखील याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले.शहर अभियंता खडकेंना गळत्यांची संख्याच माहिती नाहीशहरातील विविध भागात असलेल्या गळत्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी शहर अभियंता यांना शहरात किती गळत्या आहेत? याबाबतची माहिती मागितली. मात्र, खडके यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यावर विष्णू भंगाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, जे काम मनपाने करायला हवे होते. ते काम ‘लोकमत’ ने केले. तसेच सर्व गळत्यांची माहिती ‘लोकमत’ ने आपल्यापर्यंत पोहचवल्यानंतरही जर मनपाकडून कारवाई होत नसेल तर भविष्यात शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्याला केवळ मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.सर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?मनपा पाणी पुरवठा विभागाकडे व्हॉल्व्हमॅन, कर्मचारी व इतर सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरी गळत्या रोखण्यात अपयश का येत आहे ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. ‘लोकमत’ ने शहरातील गळत्या लक्षात आणून दिल्या असतील तर त्या गळत्या रोखण्याची जबाबदार मनपा पाणी पुरवठा विभागाची असल्याचेही लढ्ढा म्हणाले. हिवाळ्यातील चार महिन्यात धरणातील १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, आता केवळ ३० टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात भिषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मनपाने गळत्यांची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी लढ्ढा यांनी केली.धडक मोहीम राबवा - जितेंद्र मराठेशहरातील गळत्यांबाबत लोकमतने १० जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर रायपूर, कंडारी या ठिकाणच्या मोठ्या गळत्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सभेत दिली. तसेच आता शहरातील ज्या भागात लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्त करण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा सूचना मराठे यांनी मनपा पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.उपमहापौरांनीही दिले आदेश... ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सकाळी १० वाजता मनपा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांना आपल्या दालनात बोलावून घेत सर्व गळत्यांबाबतचा आढावा घेतला. तसेच ‘लोकमत’ ने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व गळत्या दुरुस्त करण्याचे आदेश उपमहापौरांनी खडके यांना दिले. दोन दिवसात सर्व गळत्या दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन खडके यांनी उपमहापौरांनी दिले. याबाबत दोन दिवसात आपण परत आढावा घेणार असल्याचेही उपमहापौरांनी खडके यांना सांगितले. ‘लोकमत’ कडून नागरिकांच्या मदतीने