शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१५ तालुक्यांसाठी केवळ सहा सहायक निबंधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

जळगाव : जिल्ह्यात सहकारी संस्थांची नोंदणी दिवसेंदिवस वाढत असून अ‌वसायनात जाणाऱ्या संस्थांचीही संख्या वाढत आहे. मात्र अशा संस्थांवर प्रशासक ...

जळगाव : जिल्ह्यात सहकारी संस्थांची नोंदणी दिवसेंदिवस वाढत असून अ‌वसायनात जाणाऱ्या संस्थांचीही संख्या वाढत आहे. मात्र अशा संस्थांवर प्रशासक नेमताना मनुष्यबळाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांसाठी केवळ सहा सहायक निबंधक आहे. त्यामुळे एकेका सहायक निबंधकाकडे अवसायनात असलेल्या तीन ते चार संस्थांचा पदभार आहे.

‘विना सहकार नही उद्धार’ असे ब्रीदवाक्य असलेल्या सहकार क्षेत्रातील स्थिती जिल्ह्याने चांगलीच अनुभवली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था उदयास आल्या व त्यांचे नावदेखील झाले. मात्र नंतर अनेक संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील कारभाराचे नावही चांगलेच गाजले.

जिल्ह्यात सहकारी संस्था वाढत जाऊन त्या कधी हजाराच्या पुढे पोहचल्या समजले नाही. जिल्ह्यात ३०१९ सहकारी संस्थांची नोंदणी झाली असून अवसायनात गेलेल्या संस्थांची संख्याही ३९० वर पोहचली. या अ‌वसायनात गेलेल्या संस्थांवर प्रशासक नेमून संस्थांचा कारभार चालविला जातो. मात्र जिल्ह्यात अवसायनात जाणाऱ्या संस्थांची संख्या वाढत असताना सहकार विभागात मनुष्यबळ कमी-कमी होत आहे.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून १५ तालुक्यांचा कारभार सहा सहायक निबंधकांवर सुरू असून अवसायनातील संस्थांचा कारभार सोपवितानाही अडचणी येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहकार विभागात भरती होत नसताना आता निवृत्त होणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. त्याला या ३१ मार्चपासूनच सुरूवात होत असून मार्च, एप्रिल, मे असे एका पाठोपाठ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होणार आहे.

या सर्वांचा परिणाम अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यावर होत प्रशासकांचे पॅनल गठीत करण्यासही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. एकूणच या सर्वांचा अप्रत्यक्षरित्या का होईना मात्र ठेवीदारांच्या हक्काच्या ठेवी परत मिळण्यावर होत आहे.