शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिक्षक पुरस्कारांसाठी केवळ १८ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:07 IST

जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ १८ प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ रद्द करण्यात आल्याने व पुरस्काराची रक्कम कमी असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्दे६ सप्टेंबर रोजी १५ शिक्षकांना देण्यात येईल पुरस्कारवेतनवाढ नसल्याने शिक्षकांनी फिरविली पाठपुरस्कारातुन ‘आदर्श’ नावही काढले

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.२३,जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ १८ प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ रद्द करण्यात आल्याने व पुरस्काराची रक्कम कमी असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविली आहे. 

जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिनानिमित्त शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम राबविणाºया शिक्षकांना शिक्षक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार जिल्हा परिषदेने २०११ पासून बंद केले होते. मात्र २०१५ मध्ये तत्कालीन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिकु मार पांडेय यांनी हे पुरस्कार सुरु केले होते. २०१५ मध्ये जिल्ह्यातील ३० ते ३५ शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी अर्ज केले होते. मात्र यावर्षी केवळ १८ शिक्षकांनी पुरस्कारासाठी  अर्ज दाखल केले आहेत. 

पुरस्कारातुन ‘आदर्श’ नावही काढलेआधी आदर्श शिक्षक पुरस्कारनावाने हे पुरस्कार दिले जात होते. मात्र या पुरस्कारातुन ‘आदर्श’ नाव देखील काढण्यात आले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ दिली जात होती. मात्र ती वेतनवाढ देखील जि.प.कडून बंद करण्यात आली आहे. यासह पुरस्कार्थींना पुरस्कारासाठी केवळ १ हजार ५०० रुपये दिले जातात. त्यामुळे शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. 

पुढील आठवड्यात मुलाखतीजि.प.प्रशासनाकडे प्राप्त  झालेल्या १८ प्रस्तावांच्या कागदपत्रांची पडताळणी जि.प.कडून मंगळवारी करण्यात आली. तसेच पुढील आठवड्यात २८ व २९ आॅगस्ट रोजी १८ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखत समितीत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह शिक्षण सभापती पोपट भोळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी आदी आहेत. ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने ६ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.