शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

ऑनलाइन श्री गणेशाने चिमुकले गोंधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

धूळपाटी ते ऑनलाइन असा शिक्षणाचा प्रदीर्घ प्रवास आहे. शिक्षक सांगतील ते ऑनलाइन ऐकायचेे, लहानश्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये डोळे फाडून बघायचे ...

धूळपाटी ते ऑनलाइन असा शिक्षणाचा प्रदीर्घ प्रवास आहे. शिक्षक सांगतील ते ऑनलाइन ऐकायचेे, लहानश्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये डोळे फाडून बघायचे आणि ते शिकायचा प्रयत्न करायचा, अशी कसरत सध्या साडेतीन ते चार वर्षांच्या नर्सरीतील मुलांची सुरू आहे. कोरोनाच्या आधीच्या काळात मुले शाळेत जात होती. शिक्षकांचे अनुकरण करून त्यांच्याकडून शिक्षण घेत होती. मुळात हे वय मुलांसाठी अनुकरण करणे, अंक, अक्षरे यांची ओळख करून घेणे. त्यासोबतच गाणी म्हणणे, गोष्टी ऐकणे आणि हुंदडणे, याचे वय असते. पण कोरोनाने या वयातच मुलांकडून त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला. ऑनलाइन येणाऱ्या अडचणींमध्ये मुले सध्या शिक्षण घेत आहेत.

१५ जुलैपासून शिक्षणाचा ऑनलाइन श्री गणेशा झाला. पण मुहूर्तालाच चुकचुकलेल्या अवस्थेत शाळेत जाण्याची वेळ मुलांवर आली नाही. घरीच नियमित वातावरणात आई-वडिलांच्या मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबसमोर मुले आली. त्यांना आता हेच कळेनासे झाले आहे, की शिकायचे तर कसे. कारण एवढ्याशा स्क्रीनमध्येच त्यांचे आभाळ सामावले आहे. सध्या दुर्दैवाने ऑनलाइन शिक्षणाची अवस्था ही तिकडून शिक्षक काय शिकवतात हे मुलांना कळत नाही आणि इकडून मुले काय करतात हे शिक्षकांना समजत नाही. बहुतेकवेळा मुले या ऑनलाइन शाळेतून पळ काढण्याचा प्रयत्न करतात.

यात शिक्षकांचीही मोठी कुचंबणा होत आहे. मुळात ऑनलाइन शाळेत कुणाला काय सांगावे, त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष कसे द्यावे, हे त्या शिक्षकांनाच कळत नाही. या ऑनलाइन वर्गात विंडो लहान झाल्यावर मुलं काय सांगायचा प्रयत्न करतेय. हे त्यांना कळणे शक्य होत नाही. काही वेळातच मुले या वर्गाला कंटाळत आहेत. आणि पळण्याची जागा शोधत आहे. बहुतेक मुलांना आपले शिक्षक समोर आल्यावर त्यांना ओळखणेदेखील कठीण जात आहे.

चिमुरड्यांच्या शिक्षणाच्या श्री गणेशाला अशी ऑनलाइनची पाल चुकचुकल्याने सध्या तरी त्यांचे भविष्य अंधारातच आहे.