शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक हिंसाचार पीडितांना आॅनलाईन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:09 IST

नामांकित संस्थांचा सहभाग

जळगाव : कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शासकीय तसेच विविध स्वयंसेवी संस्था अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनकडून घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार बुडत आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढू शकतो. याचे परिणाम प्रामुख्याने महिलांना मोठ्या प्रमाणात जाणवतात. महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांना संरक्षण तसेच त्यांना कायदेतज्ज्ञांंरकडून कायदेशीर मार्गदर्शन, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन, वैद्यकीय तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला इत्यादी नामांकित संस्था आपआपल्या पध्दतीने समाजातील पीडित व्यक्तिंना आॅनलाईन मार्गदर्शन, मदत इत्यादी सुविधा पुरवित आहेत. विविध नामांकित संस्थांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच १०० व १०८ हे हेल्पलाईन क्रमांकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलांसाठी विजय कॉलनी (गणेश कॉलनी) आशादीप महिला वसतिगृह येथे २४ तास वनस्टॉप सेंटर कार्यरत आहे. यामध्ये एका छताखाली पीडित अत्याचारीत महिलांना मदत मिळावी यासाठी महिलांना कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आरोग्यविषयक मदत, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था, समुपदेशन, पोलीस यंत्रणेशी समन्वय, कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जात आहेत.कौटुंबिक हिंसाचारातंर्गत पीडित महिलांच्या मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा विधीसेवा समिती यांच्या अधिपत्याखाली संरक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.हे संरक्षण अधिकारी, त्यांचे कार्यक्षेत्र व भ्रमणध्वनी क्रमांक याप्रमाणेआरती साळुंखे -जळगाव जिल्हा, महेंद्र बेलदार - जळगाव ग्रामीण, रिटा भंगाळे - चोपडा ग्रामीण, विशाल ठोसरे - जामनेर ग्रामीण, आशिष पवार - पाचोरा ग्रामीण, मिलिंद जगताप - रावेर ग्रामीण, योगिता चौधरी - अमळनेर, प्रतिक पाटील - बोदवड, चंद्रशेखर सपकाळे - धरणगाव ग्रामीण, प्रतिक पाटील- भुसावळ ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार), सुदर्शन पाटील -भडगाव ग्रामीण, प्रशांत तायडे - मुक्ताईनगर ग्रामीण, उर्मिला बच्छाव - एरंडोल ग्रामीण, राजू बागूल- पारोळा ग्रामीण, मिलिंद जगताप - यावल ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार), सुदर्शन पाटील- चाळीसगाव ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार).तसेच विधी व सेवा प्राधिकरण यांच्यावतीने विधी सल्लागार, विधी तज्ज्ञ यांचीही नेमणूक केलेली आहे. अ‍ॅड. संध्या वानखेडे, अ‍ॅड. मंजुळा मुंदडा, अ‍ॅड. रुपाली भोकरीकर, अ‍ॅड. काबरा यांचा त्यात समावेश आहे.समुपदेशन केंद्रातील समुपदेशक, त्यांचे कार्यक्षेत्र या प्रमाणे -शोभा हंडोरे - जळगाव, विद्या सोनार - जळगाव, रेणू नरेंद्र प्रसाद -अमळनेर, मिनल पाटील - अमळनेर, भारती केशव म्हस्के - भुसावळ, शीतल आव्हाड -भुसावळ, विठ्ठल शिवाजी पाटील - चाळीसगाव, पुनम हि. जगदाळे - चाळीसगाव.वन स्पॉट सेंटरसाठी नियुक्त अधिकारीआरती साळुंके, केंद्र प्रशासक, संध्या वानखेडे, विधी सल्लागार, निता कायटे, पोलीस अधिकारी, विद्या सोनार, समुपदेशक. याप्रमाणे नेमणूक करण्यात आलेल्या आहेत.कौटुंबिक हिेसाचारातील पीडित महिलांनी वरील अधिकाऱ्यांची संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव