शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आॅनलाईन सातबाराचा डाटा नष्ट

By admin | Updated: February 22, 2017 00:23 IST

तलाठ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी : शेतकºयांचे प्रचंड नुकसान

हिंगोणा : जळगाव जिल्हा सर्व्हअरचा वेग वाढविण्यासाठी  ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान, जिल्ह्यातील  तलाठी यांचे आॅनलाईनचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आॅनलाईनचे काम सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा तलाठी व शेतकरी यांना होती. परंतु खोदा पहाड निकला चुंहा  या म्हणीप्रमाणे प्रणालीचा वेग वाढला नाही परंतु प्रणालीतील मागील काही दिवसांचा डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले.त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.    आॅनलाईन सातबारा सर्वेअर मंद गतीने चालत होते. त्याचा  वेग वाढण्याबाबत जिल्हाधिकारी व तलाठी संघ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याला नवीन सर्व्हर देण्यात आले. नवीन सर्व्हर  दिल्यानंतर काहीही फायदा झाला नाही. पूर्वीपेक्षा वेग मंदावला, ३०.१.२०१७ ते २.२.२०१७ आॅनलाीन प्रणाली पूर्णपणे बंद पडली. साधा ७/१२ निघण्यासाठी १३ ते १४ मिनिट कालावधी लागतो, संगणकात फेरफार होण्यासाठी  तासापेक्षाही जास्त वेळ लागत आहे, जनतेची कामे जलदगतीने होण्याऐवजी मंदगतीने होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.हे सर्व होत  असतानाच आज  २१ रोजी   जिल्ह्यातील सर्व गावांचा प्रणातील मागील आठ ते १५ दिवसांपूर्वी तलाठी  यांनी रात्रंदिवस बसून फिड केलेला डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले आहे.यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.तलाठी यांनी प्रणालीत घेतलेल्या नोंदी आढळत नाही.   मंडळ अधिकारी यांनी प्रणालीत केलेले फेरफार सापडत नाही. त्यामुळे आज ज्या शेतकºयांनी तलाठी कार्यालयातून ७/१२ घेतले त्यातील काही शेतकरी ७/१२ बघून आवाक झाले. कारण ७/१२ उताºयावर फेरफार झालेला नव्हता. यामुळे प्रशासनाने या बाबत तत्काळ लक्ष घालून डाटा पूर्ववत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.यानिमित्त  शेतकºयांचा तलाठी कार्यालय व परिणामी महसूल प्रशासनावर  रोष निर्माण होत आहे. प्रकल्पात सुधारणा होण्यासाठी तलाठी संघाने दोन वेळा आंदोलन केले. लोकप्रतिनिधी या नात्याने विविध आमदारांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली तरी सुद्धा राज्यशासन निद्रा अवस्थेतच आहे. (वार्ताहर)आॅन लाईन  ७/१२ डाटा नष्ठ होणे ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. आता पुन्हा नव्याने तलाठी वर्गाला काम करावे लागणार आहे.आधीच निवडणूक कामाचा ताण सहन करुन तलाठी वर्गाने जिवापाड मेहनत घेऊन सातबाराच्या नोंदी केल्या.      - एन.आर.ठाकूर, तलाठी, संघटना, जिल्हाध्यक्ष, जळगाव.आज   लॉग इन केले असता हिंगोणे गावाच्या ८१२९ ते ८१४० पर्यंतच्या फेरफार नोंदीनष्ट झाल्याचे आढळून आले. असाच अनुभव जिल्ह्यातील इतर तलाठी व मंडळ अधिकारी यांना आला.  ही बाब शासनाने गांभीर्याने घेणे गरजेची आहे     - जे.डी.बेहाळे, तलाठी, हिंगोणा आॅनलाईन ७/१२ डाटा नष्ट झाल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  शासनाने त्वरित लक्ष द्याव.     - सागर राजेंद्र महाजन, शेतकरी