शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरातर्फे यंदा ऑनलाईन दर्शनाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार ओंकारेश्वर मंदिर प्रशासनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसून, घरबसल्या ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार ओंकारेश्वर मंदिर प्रशासनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसून, घरबसल्या भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा व मंदिरावरही एल. ई. डी. स्क्रीन उभारून दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे. तसेच महाशिवरात्रीनिमित्त या दिवशी श्री ओंकारेश्वर मंदिरात २४ तासात ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

जळगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या दिवशी मंदिर प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन व यात्रोत्सव भरविण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्यामुळे, मंदिर प्रशासनातर्फे फक्त अभिषेक व पूजेसाठी मंदिर उघडे ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला कुठल्याही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसून, ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इन्फो :

२४ तास सुरू राहणार अभिषेक

मंदिर प्रशासनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त ११ रोजी पहाटे ४ वाजता मंदिर उघडण्यात येणार आहे. संपूर्ण दिवस-रात्र २४ तासांत ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रथम पर्व पहाटे ५ ते ७, दुसरे पर्व सकाळी १० ते दुपारी १२, तिसरे पर्व दुपारी ४ ते सायंकाळी ६, तसेच रात्रीचे प्रथम पर्व सायंकाळी ७ ते रात्री ९, दुसरे पर्व १० ते १२, तिसरे पर्व रात्री १ ते ३, व चौथे पर्व पहाटे ४ ते ६ या वे‌ळात होणार आहे. अभिषेक पूजनानंतर विशेष महाआरतीचा कार्यक्रम होणार असून, दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्ताला व सायंकाळी गोरज मुहूर्ताला ६ वाजता विशेष महाआरतीचा कार्यक्रम होणार असल्याचे ट्रस्टचे व्यवस्थापक दीपक जोशी यांनी कळविले आहे.