७/१२वर ऑनलाइन पीकपेरा कसा लावावा याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. चूक दुरुस्ती व अपलोड माहिती डिलीट होत नाही, अशा अनेक अडचणी येत आहेत. आता नेमके काय करावे. पीकपेरा नही लावला तर पीकविमा मिळणार नाही म्हणून शेतकरी चिंताग्रस्त झालेले असतात. नायब तहसीलदार सुभाष कुंभार व त्यांच्या टीमने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करून शेंदुर्णी पारस मंगल कार्यालय येथे बोलावून त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या.
त्यांना माहिती व मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मोबाइलवर पीकपेरा लावून दाखविण्यात आला यात. या मोहिमेत सुमारे ५०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. यावेळी जामनेर पं.स.चे मंडळ कृषी अधिकारी नीता घाडगे, शेंदुर्णी सजाचे मंडळ अधिकारी हर्षल पाटील, वाकडी विभागाचे मंडळ अधिकारी विष्णू पाटील, तलाठी एस. एम. नाईक यांनी कामकाज केले.