शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याचीही ऑनलाइन हजेरी

By admin | Updated: January 8, 2017 00:07 IST

‘उपस्थिती’ अॅप : शाळांवर राहणार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने वॉच, कार्यवाही सुरू

धुळे : शालेय पोषण आहारासंबंधी ऑनलाइन माहितीनंतर आता शिक्षण विभागाने विद्याथ्र्याची दैनंदिन हजेरीही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षण विभागाने ‘उपस्थिती’ नावाचे अॅप विकसित केले आहे. ऑनलाइन हजेरीची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.स्टुडंट पोर्टलवर माहितीशिक्षण विभागाने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये स्टुडंट पोर्टलमध्ये ही माहिती संकलित करण्यात येणार आहे. विद्याथ्र्याची दैनंदिन हजेरी भरण्यासाठी डेली अटेंडन्स अॅप डाऊनलोड करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवर सोय करण्यात आली आहे.दररोज भरावी लागणार माहितीया अॅपमध्ये सर्व शाळांनी माहिती दररोज भरावयाची आहे. तुकडी व इयत्तानुसार हजेरी भरावी लागणार आहे. यासाठी शिक्षकांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोनयासाठी प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. या मोबाइलवरूनच शिक्षकांना ही माहिती भरावयाची आहे.अॅप डाउनलोड करण्यापूर्वीहे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करण्यापूर्वी शाळांना आपल्या स्टुडंट पोर्टलवर दोन सुधारणा कराव्या लागणार आहेत. बदली करून गेलेले शिक्षक डिलीट करून नवीन शिक्षक क्रिएट करावे लागणार आहेत. या दुरुस्त्या स्टुडंट पोर्टलच्या मेंटेनन्स टॅबमध्ये कराव्या लागणार आहे.  क्रिएट टीचर या मेन्युत प्रत्येक शिक्षकाचा मोबाइल क्रमांक अॅड करून एक आयडी नंबर तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वर्ग किंवा तुकडीचा शिक्षक नेमावा लागणार आहे. रजिस्टर मोबाइलने लॉगिनवरील प्रक्रिया झाल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर जाऊन हे उपस्थिती अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. शाळेचा युडायस क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर मोबाइलने लॉगिन करावे लागणार आहे. हा मोबाइल नंबर बदलण्याची सोयही यामध्ये करण्यात आलेली आहे. फक्त अनुपस्थितांची माहितीउपस्थिती अॅपमध्ये शिक्षक तुकडी, दिनांक निवडून विद्याथ्र्याची हजेरी भरावयाची आहे. यामध्ये फक्त अनुपस्थित विद्याथ्र्याचीच माहिती शिक्षकांना भरावी लागणार आहे. या माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाची आहे. यानंतर अटेंडन्स रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर शिक्षकाला वर्गातील प्रत्येक विद्याथ्र्याची हजेरी दिनांकानुसार पाहता येणार आहे.मोबाइल वापर परिणामकारपणेसध्या शिक्षण विभागाकडून अॅण्ड्रॉईड मोबाइलचा उपक्रम परिणामकारकपणे सुरू केला आहे. शालेय पोषण आहाराची माहिती भरण्यासाठीही शिक्षण विभागाने अॅप सुरू केले आहे. हा शिक्षण विभागाचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाने मोबाइलचा वापर परिणामकारकपणे सुरू केला आहे. ज्याठिकाणी शाळा डिजिटल करणे शक्य नाही त्याठिकाणी मोबाइल डिजिटल शाळा सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्याथ्र्याना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

विद्याथ्र्याच्या ऑनलाइन हजेरीसंदर्भात राज्यस्तरावरून आदेश आलेले आहेत. हे अॅप ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झालेले आहे. उपस्थिती अॅप झाल्यामुळे यावर लगेच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-मोहन देसले,प्राथमिक शिक्षणाधिकारी.