शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

 जळगावात मित्राच्या भेटीसाठी गेलेल्या तरुणाची मेहरुण तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 20:46 IST

पुण्याला जाणा-या मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडलेल्या दुर्गेश राजू ठाकूर (वय २३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी बाहेरचा तणाव किंवा भांडण यातून ही घटना घडल्याची शक्यता दुर्गेशच्या वडीलांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देदुचाकी व कपड्यांवरुन पटली ओळख दीड तासाने सापडला मृतदेहआत्महत्येचे कारण अस्पष्ट

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १४ : पुण्याला जाणा-या मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडलेल्या दुर्गेश राजू ठाकूर (वय २३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी बाहेरचा तणाव किंवा भांडण यातून ही घटना घडल्याची शक्यता दुर्गेशच्या वडीलांनी वर्तविली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दुर्गेश हा पुणे येथे टाटा मोटर्स या कंपनीत नोकरीला होता. २ जानेवारीपासून तो घरी खेडी येथे आलेला होता. रविवारी सकाळी नळांना पाणी आल्यानंतर वडीलांनी संक्रातीनिमित्त दुचाकी धुतली. त्यानंतर सकाळी आठ वाजता पाण्याची पाच लिटरची कॅन घेऊन तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.पी.१५२८) घराबाहेर पडला. जातांना त्याने पुण्याला मित्र रेल्वेने जात असून त्यांच्यासाठी पाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. बराच वेळ झाल्यानंतर मुलगा घरी आला नाही म्हणून वडीलांनी तसेच लहान भाऊ ऋषीकेश याने त्याला फोन केले, मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भाऊ सकाळी अकरा वाजेपासून त्याच्या शोधात असताना त्याने सहज मेहरुण तलावाकडे येऊन बघितले तर तलावाजवळ रस्त्यावर त्याची दुचाकी होती. त्यामुळे भावाने त्याला पुन्हा फोन केला. तरीही प्रतिसाद मिळत नव्हता,परंतु मोबाईलच्या रिंगचा आवाज येत असल्याने ऋषीकेश त्या दिशेने चालत गेला असता तलावाकाठी त्याचे टी शर्ट, मोबाईल व दुचाकीची चावी आढळून आली. दीड तासाने सापडला मृतदेहएमआयडीसी पोलीस स्टेशनचे अशरफ शेख व गोविंदा पाटील यांनी दुपारी दोन वाजता पोहणा-यांना घटनास्थळी आणले. तेव्हापासून दुर्गेश याचा मृतदेह शोधायला सुरुवात केली असता साडे तीन वाजता रवी हटकर या तरुणाच्या हाती मृतदेह लागला. मेहरुण, तांबापुरा येथील पट्टीचे पोहणारे तसेच मनपाच्या कर्मचा-यांनी यासाठी अथक मेहनत घेतली. दीड तासानंतर त्यांना यश आले. तेथून लगेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.