शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू

By admin | Updated: May 27, 2017 18:19 IST

आरोपींच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनवर जमाव

ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.27- पूर्व वैमनस्यातून अनिलनगरातील दोन गटात  झालेल्या हाणामारीत  मुन्ना शहार याचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू  झाला. या घटनेत 7 जण जखमी झाले होते. ही घटना 26 रोजी दुपारी साडेचार वाजता करगाव रोडवरील उन्नती मंडळाजवळ घडली होती. या घटनेचे दुस:या दिवशी पडसाद उमटले. एकाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने  पोलीस स्टेशनवर धडकत आरोपीच्या अटकेची मागणी केली.
या घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे. सैयद वसीम सैयद याकूब यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की,  मैनू शहा, मुन्ना शहा, शकील शहा, संजीव शहा, अशपाक शहा, हैदर अली सैयद (सर्व रा. अनिलनगर) यांनी फिर्यादी याला मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
दुस:या फियार्दीत रियाज शहा कादर शहा यांनी म्हटले आहे की,  नसीर उर्फ अप्पी मिङरा, वसीम सैयद याकूब सैयद, वसीमचा मोठा भाऊ, कामरान बेग, बबलू मिङरा व अन्य 4-5 जणांनी हातात लाठय़ाकाठय़ा , तलवार , कोयते घेवून मशिदीजवळ व करगाव रोडवरील उन्नती मंडळाच्या शाळेजवळ मुन्ना शहा, हैदर अली सैयद, सलीम शहा यांच्यांवर प्राणघातक हल्ला केला. तीन जण गंभीर असून त्यांना धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यातील मुन्ना शहा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सलीम शहा व हैदरअली याचेवर उपचार सुरु आहेत.
पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जमाव
जखमी मुन्ना शहा याचा मृत्यू 26 रोजी सायंकाळी 6 वाजता झाला मात्र ही माहिती नातेवाईकांना कळविली नाही. 27 रोजी सकाळी माहिती कळताच संतप्त जमावाने पोलीस स्टेशन गाठले व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी लावून धरली.  मुन्ना शहा याचा मृतदेह शनिवारी दुपारी 1 वाजता अनिलनगरात आल्यावर त्याची प}ी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.  दुपारी अनिलनगर व स्टेशन परिसरातील सर्व दुकाने बंद होती. या भागातील वाहतूकही काही तास ठप्प झाली होती. पातोंड यांनी तात्काळ पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवल्यावरुन दंगा नियंत्रण पथक, सीआरपीचे जवानांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. दुपारी साडेतीन वाजता मुन्ना शहा याची अंत्ययात्रा काढण्यात आली.