पोलिसांनी सांगितले की, साकेगाव येथून जळगावकडे वाळू भरण्यासाठी येत असलेल्या (एम.एच. १९ - झेड ३१२३) या क्रमांकाच्या डम्परला (एम.एच.१८ - बीए ४१८८) या क्रमांकाच्या टँकरने राँग साईडने भरधाव वेगात येऊन समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात डम्पर चालक देवानंद नथू पाटील वय ३५ यांच्या दोन्ही पायांना, गुप्तांगाला, पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, आलियार खान, संजय जाधव, लीना लोखंडे, प्रवीण ढाके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. डम्परवरील क्लीनर विकास युवराज तायडे (१९, रा. साकेगाव) यांनी फिर्याद दिल्यावरून टँकर चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ. आलियार खान तपास करीत आहेत.
नशिराबादला अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST