शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एकाही शेतकºयाला १० हजारांचे पीककर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:36 IST

‘एनपीए’ वाढण्याची बँकांना भीती : सहकार विभाग देतेय पोकळ आश्वासन

ठळक मुद्देराज्यात केवळ ४ हजार शेतकºयांना तात्काळ कर्जधुळ्यात केवळ १७ शेतकºयांना कर्जअर्ज भरल्यासच मिळणार तात्काळ कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकाही शेतकºयाला शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामाकरिता तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच थकबाकी असलेल्या शेतकºयांना आणखी १० हजार रुपये कर्ज देऊन एनपीएत वाढ होण्याचीच भीती असल्याने बँकांकडून हे कर्ज देणे टाळले जात आहे. संपूर्ण महाराष्टÑात आतापर्यंत केवळ ४ हजार शेतकºयांनाच हे तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळाले असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.१०हजारांच्या कर्ज वितरणासाठी शिखर बँकेकडून जिल्हा बँकेला ९.५ टक्के दराने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दर्शविली. मात्र या कर्जाची हमी न घेतल्याने जिल्हा बँकांचे नुकसान असल्याने जिल्हा बँकांनी हात वर केले आहे. त्यामुळे व्यापारी बँकांवर (राष्टÑीयकृत) हे कर्ज वितरणासाठी दबाव येत आहे.३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना शासन निर्णयातील निकषांच्या अधिन राहून खरीप पिकासाठी कर्ज वितरण करण्याकरीता ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार व्यापारी बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.त्यानुसार सर्व व्यापारी बँकांनी शेतकºयांना पीक कर्जाचे तातडीने वाटप करावे, असे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. तसेच ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी तातडीच्या दहा हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत खरीप कर्जासाठी नजीकच्या व्यापारी बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. प्रत्यक्षात मात्र बँकांकडून शेतकºयांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण शेतकºयांचे कर्ज थकीत असल्याने ते बँकांच्या एपीएमध्ये गणले जात आहे. त्यात आणखी दहा हजार रुपये शेतकºयांना दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता कमी असल्याने हे कर्जही एनपीएतच जमा होणार हे स्पष्ट आहे.त्यामुळे बँकांची एनपीएत वाढीचा धोका पत्करून हे कर्ज देण्याची तयारी नसल्याचे समजते. मात्र सहकार विभागाकडून पीककर्जासाठी मुदतवाढ मिळाली असून शेतकºयांनी बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. प्रत्यक्षात बँका मात्र नकार देत आहेत. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होत आहे.जिल्हा बँकांची नकारघंटाजिल्हा बँकांची आधीच वसुली कमी झाली आहे. मागील वर्षी जळगाव जिल्हा बँकेची २५ टक्के वसुली झाली. तर नाशिक जिल्हा बँकेची ५ टक्के, नगर ३० टक्के तर कोल्हापूर जिल्हा बँकेची ४० टक्के वसुली झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना शिखर बँकेकडून ९.५ टक्के दराने पैसे घेऊन शेतकºयांना ४.५ टक्के दराने देणे जिल्हा बँकांना परवडणारे नसल्याने जिल्हा बँकांनी हात वर केले आहेत़शासनाने शपथपत्र भरून देण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्यामुळे त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली. हे सर्व १७ शेतकरी राष्टÑीयकृत बॅँकाचे कर्जदार असल्याचे ते म्हणाले. शेतकºयांनी तातडीने शपथपत्र भरून बॅँकेत जमा केल्यास त्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले.आतापर्यंत ३० हजारांहून अधिक शेतकºयांनी त्यांचा पीक विमा उतरविला असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत पीक विमा उतरविणाºया शेतकºयांची संख्या वाढू शकणार आहे.