शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 15:44 IST

पळासखेडे बुद्रुक येथील घटना.

पळासखडे बुद्रुक, ता.जामनेर : येथील सुरेशचंद्र धारीवाल पॉलीटेक्निक महाविद्यालयाजवळ दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात येथून जवळच असलेल्या केकतनिंभोरा गावातील रहिवाशी अशोक जगन शिंगोटे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभय संजय जाधव (वय २५ रा.गोद्री ता.जामनेर) हा गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना २८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.शिंगोटे यांच्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर जामनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शिंगोटे हे आपल्या पत्नीला भेटून दुचाकीने (एम.एच.१५ - ए.पी.१४८७) जामनेरहून केकतनिंभोरा येथे जात असताना नेरी कडून जामनेरकडे येणाऱ्या दुचाकीशी (एम.एच.१९ - डी.ई .९५८२) समोरासमोर धडक झाली. त्यात अशोक शिंगोटे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा शव विच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमी अभय जाधव याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मयत शिंगोटे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,१ मुलगी असा परिवार आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.