शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डागडुजीचे दीड लाख खड्डय़ात!

By admin | Updated: September 12, 2014 15:06 IST

महापालिकेतर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली असली तरी गणेश विसर्जनाच्या दिवशीच जोरदार पाऊस झाल्याने सर्वच रस्त्यांवरील डागडुजी उखडल्याने 'जैसे थे' परिस्थिती झाली आहे.

५0 लाखांची तरतूद

धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली होती. परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशीच जोरदार पाऊस झाल्याने सर्वच रस्त्यांवरील डागडुजी उखडल्याने 'जैसे थे' परिस्थिती झाली आहे. यामुळे मात्र वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्य़ापूर्वीच रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक असल्याने महापालिकेतर्फे निविदाही काढण्यात आली होती. 
परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने स्वत: खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. परंतु पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण झाले. गणेशोत्सवामुळे मिरवणुका काढण्यात येणार्‍या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते. त्यानुसार मनपाने शहरातील आग्रा रोडसह मुख्य रस्त्यांवरील खड्डे खडी-मुरुमाच्या साहाय्याने बुजविले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी एक ते दीड लाखाचा खर्च करण्यात आला. परंतु दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे तयार झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे असल्याने तो टाळताना वाहनचालकांचा तोल जाऊन लहान-मोठे अपघातही होत आहेत. शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही खड्डे बुजविण्याचे काम वेळेत होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे खडी व मुरुमाने बुजविण्यात आले होते. यासाठी एक ते दीड लाखाचा खर्च झाला आहे. कायमस्वरूपी खड्डे बुजविण्याची कार्यवाही पावसाळा संपल्यानंतर लगेच केली जाणार आहे. 
-कैलास शिंदे, अभियंता, बांधकाम विभाग, मनपा