शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

पुराने वाहून नेली १०० एकर शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:32 IST

पहूरच्या गोगडी नदीचा फटका :कपाशी, मका, भाजीपाल्यसह पिके पाण्यात

पहूर, ता. जामनेर : महसूल मंडळ परीसरात पावसाने कहर केला. गोगडी नदीला आलेल्या महापूरात नदीकाठाच्या दूतर्फा तब्बल शंभर एकर क्षेत्रावरील उभ्या पिकांसहित शेती वाहून गेली आहे. तर अन्य शिवारातील कपाशी, सोयाबीन पिके आजही पाण्यात असल्याने कापूस वेचणीही होणार नाही. मका, ज्वारी कणसे सडून गेले आहे. त्यामुळे कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा स्थितीत बांधावर बसून पिकांकडे पाहून रडण्यापलीकडे शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.गेल्या आठवड्यत झालेल्या अवकाळी पावसामुळे पहूर आणि परिसरातील पंचवीस खेड्यातील शेतकºयांवर आसमानी संकट कोसाळले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तेलही गेले.. तूपही गेले..हाती धुपटणे आले ..शेरी येथील रहिवासी मधुकर पांडुरंग बनकर हे भुमीहीन शेतकरी असून त्यांनी शेंगोळा शिवारात जमीन भाडेपट्टयाने केली आहे. मात्र तीन एकर जमिनीत मका सडून कणसांना कोंब आले आहे. कपाशीत पाणी असल्याने कापूस वेचणी करता येत नाही. बारा ते पंधरा एकर जमीनतील जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न पाण्यात गेले आहे. सध्या उत्पन्न तर सोडाच पण शेतीला लागलेला खर्चही निघणे अवघड आहे. त्यामुळे तेलही गेले.. तूपही गेले...हाती धुपाटणे आले अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे.अनेकांची शेती वाहिलीगोगडी धरणाच्या जवळून खचार्णा पर्यंत वाहणाºया गोगडी नदीला गेल्या शनिवारी महापूर आला.यात नदीच्या दुतर्फा शंभर एकर क्षेत्रातील जमीनी सहित वाहून गेले आहे. युवराज पंडीत बनकर यांच्या साडेतीन एकर जमीनीतील कपाशी, मिरची,गिलके वाहून गेले आहे. ठिबकसंचही वाहून गेला. जमीन नदीपात्रासारखी दिसून येत आहे. याच काठावरील ओंकार पंडीत बनकर, नितीन रघुनाथ वारूळे अशा सत्तर शेतकºयांची जमीन पिकांसह वाहून गेली. शिवनगरशिवारातील एकनाथ संपत करंवदे यांचे वीस एकर क्षेत्रात कपाशी, सोयाबीन ,मिरची,गिलके पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन सडल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. मिरची,गिलके नष्ट झाली आहे.सात हजार शेतकºयांच्याशेतातील नुकसानीचे पंचनामेपहूर मंडळातील १७ गावात १३ हजार ४६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र असून १० हजार १०५ शेतकरी आहेत.पैकी ७ हजार २३७ शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे केले आहेत. राहिलेले पंचनामेही पूर्ण होत आले आहे. साडेतीन हजार हेक्टरवर मका तर १८ हजार ५०० हेक्टर कपाशी लागवड झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक, क्रुषी साहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानबाधित क्षेत्रांचचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले आहे.दरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी पाहणी करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.