शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

वाघूरवरील जुना पूल अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 22:54 IST

साकेगावकरांच्या राहणार स्मरणात : नव्या पुलावरुन होत आहे वाहतूक

भुसावळ : अनेक लहान-मोठे अपघात तसेच प्रचंड दळणवळणाचा साक्षीदार असलेला राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावच्या वाघुर नदीवरील पूल अखेर जमीनदोस्त अर्थात इतिहासजमा झाला आहे.नवीन पूल बांधण्यात आल्याने हा जीर्ण पूल नुकताच पाडण्यात आला. पूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर या पुलाच्या ठिकाणी १२५० फूट लांबीची फरशी बांधली होती व यावरून वाहतूक होत होती. फरशी पुलावरून पाणी गेल्यास अनेक वेळा रहदारीस अडथळा निर्माण होत होता. यानंतर येथे हा पूल बांधणीकरिता प्रथम १९५०ला कामाची प्राथमिक पाहणी पूर्व खान्देश विभाग एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्याकडून करण्यात आली होती .१९५२ पूल बांधण्याचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविले व १९५३ ला यास मंजुरी मिळाली मंजुरी मिळाली.असा होता पूलपुलाची एकूण लांबी ७०५ फूट, रुंदी २६ फूट ६ इंच तर पुलावरील रस्त्याची रुंदी २४ फूट होती. नदीच्या पात्रापासून सरासरी उंची ४५ फूट होती. एकूण ७ कमानी होत्या व प्रत्येक कमानीची रुंदी ८० फूट होती. पुलाच्या कमानी लोखंडी सळया व सिमेंट काँक्रीटच्या वापर करून तयार केल्या होत्या.सहा इंच जाडीचा सिमेंटकॉंक्रीटचा थर टाकला होता. आता हा पूल पाडण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून नवीन पूल बांधला गेला असला तरी हा जुना पूल साकेगावकरांसाठी स्मरणात राहील असाच होता.या अधिकाऱ्यांनी पाहिले काममुंबईच्या दि उषा ट्रेडिंग कंपनीला पुलाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते यासाठी चिफ इंजिनिअर म्हणून यु महिदा, डब्ल्यू एक्स मॅक्सरेन्हस, यु. जे. भट्ट, सुपरहीटेड इंजिनिअर म्हणून के. व्ही. जोगळेकर डब्ल्यू काळे, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एल. आहुजा, जी.एस. पडवळ, एन . कुडाळकर, वाय. रोहेकर, डेप्युटी इंजिनीयर म्हणून ढमढरे, शिंपी,घूगे पेटकर देव्हरे यांनी फुलाची डिझाइनिंग निर्मिती केली होती.