शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जन्मभूमीतल्या टॅलेंटसाठी अधिकाऱ्यांची ‘मदत साखळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 20:35 IST

चाळीसगावात साकारली अभ्यासिका

चाळीसगाव, जि.जळगाव : माणसाला प्रगतीची चाके लागली की, त्याला आपल्या जन्मभूमीचा विसर पडतो. यशाची आतषबाजी त्याची नाळ तोडून टाकते अर्थात याला चाळीसगावच्या जन्मभूमीतील अधिकारी अपवाद ठरले आहेत. ‘गे मायभू तुझे फेडीन पांग सारे...’ असा संकल्प करणाºया अधिकाºयांची साखळी जोडण्याचे काम डॉ.उज्ज्वला देवरे करीत आहे. आपल्या मायभूमीतील टॅलेंटला यशाची झळाळी देण्यासाठी हे अधिकारी पुढे सरसावले असून, डॉ. देवरे यांनी स्वखर्चाने अभ्यासिकाही उभारली आहे.स्पर्धा परीक्षांचा लक्ष्यभेद करणे अवघड आहेच. तथापि, त्यासाठी लागणारे अभ्यासाचे साहित्य, सखोल मार्गदर्शन यांची ग्रामीण भागात आजही वानवा आहे. महानगरात क्लासेस उपलब्ध असतात. परंतु त्यांचे आणि ग्रंथालयांचे शुल्क भरणे अनेकांना शक्य होत नाही. यामुळे अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न भंग पावते. सर्वसामान्य कुटुंंबातील मुले या वर्तुळातून बाहेर फेकले जातात. टॅलेंट असूनही त्यांच्या पदरी निराशा येते. हे बदविल्यासाठी 'अधिकाºयांचे भावी अधिकाºयांसाठी मिशन' ही चळवळ उभी राहत आहे. यासाठी डॉ. देवरे फाऊंडेशनने अधिकाºयांची साखळी जोडायला सुरुवात केली आहे.डॉ. उज्ज्वला व डॉ. जयवंत देवरे यांचे सुपुत्र डॉ. अर्जुन देवरे यांनी २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत यश मिळविले. सद्य:स्थितीत ते ब्राझील येथे राजदूत आहे. मुलाच्या यशातून देवरे दाम्पत्याला अधिकाºयांची साखळी जोडण्यासह अभ्यासिका उभारण्याचा मार्ग गवसला. गेल्या काही वर्षात चाळीसगाव येथील डॉ. उज्वलकुमार चव्हाण, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. कविता पाटील, अक्षय पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अचूक लक्ष्यभेद केला आहे. हा टक्का अजून वाढवा. यासाठीच १८ रोजी अभ्यासिकेचे लोकार्पण होत आहे.लक्ष्मीनगरात डॉ.देवरे रुग्णालयाच्या परिसरातच ही अभ्यासिका डॉ. देवरे यांनी स्वखर्चाने उभारली असून येथे स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे अभ्यासिकेत वर्षभर मूळ चाळीसगावकर असणारे आणि इतर अधिकारीही मार्गदर्शन करणार आहेत.१८ रोजी औरंगाबाद येथील सहायक आयकर आयुक्त विष्णु औंटी हे मार्गदर्शनाचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. यावेळी प्रो. संजय मोरे हे करिअर मार्गदर्शक तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभिजित पवारदेखील उपस्थित राहणार आहेत.चाळीसगाव तालुक्यात असणाºया टॅलेंटला व्यासपीठ मिळावे. यासाठी अधिकाºयांची मार्गदर्शन साखळी आणि अभ्यासिकेचा उपक्रम योजिला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत मोफत मार्गदर्शनही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.-डॉ.उज्ज्वला देवरे, अध्यक्षा, डॉ.देवरे फाऊंडेशन, चाळीसगाव