शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तहसील कार्यालयात पासर्डीचे ग्रामस्थ झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:43 IST

दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी ता.भडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ६ रोजी भडगाव येथील तहसील कार्यालयाकडून काही अधिकारी आले होते. त्यांच्या समोरच या असंतोषाचा भडका उडाला.येथील स्वस्त धान्य दुकानदारास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्वस्त धान्य दुकानदार राजू मिस्तरी व ग्रामस्थांमध्ये हुज्जत झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पासर्डी येथील रेशन दुकानदार राजू मिस्तरी स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळे येथील अनेक नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचीत रहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात पासर्डी गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता.कार्यवाही सुरू असतानाच दुकानदार व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे गावात काही काळ तणावग्रस्त स्थिती होती. या दुकानदारावर तत्काळ कारवाई करून त्याच्या कडील स्वस्त धान्य दुकान त्वरित काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.प्रसंगी भडगाव येथील पुरवठा निरीक्षक किशोर महाले कजगावचे तलाठी बी. एम.परदेशी, पासर्डीचे सरपंच बाळू पाटील, ग्रामसेवक उमेश परदेशी, कोतवाल नितीन कोळी, माजी सरपंच वासुदेव पाटील, ग्रा. प. सदस्य सुनील सोनवणे, मंगलबाई सोनवणे, विकासो चेअरमन प्रताप पाटील, छावा संघटनेचे भगवान पाटील, मनसेचे कैलास जाधव, जयराम पाटील, राजेंद्र पाटील, वाल्मिक कोळी, नामदेव वाघ व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, या घटनेची पासर्डी मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामस्थांना धान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी दाखल होत नागरिकांची समजूत काढली.दुकानदार दोषी आढळल्यास कारवाईगावातील एका नागरिकाने वरिष्ठस्थरावर तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेवून पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पासर्डी गावाला भेट दिली व योग्य त्या सूचना पुरवठा व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. त्या प्रमाणे पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी पासर्डी गावाला भेट दिली व दुकानदार व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. रेशन दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तरीदेखील ग्रामस्थांचा असंतोष कमी झाला नव्हता. त्यांनी दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी अधिकाºयांकडे केली.त्यामुळे वातावरण आणखी तापले होते.