शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे औषध दिल्याने डॉक्टरसह विक्रेत्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:17 IST

अमळनेर : आठ महिन्यांपूर्वी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय समितीने अहवाल दिल्यावरून एका डॉक्टरसह औषधी विक्रेत्यावर ...

अमळनेर : आठ महिन्यांपूर्वी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय समितीने अहवाल दिल्यावरून एका डॉक्टरसह औषधी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शालीकराम परशुराम महाजन (वय ४२) यांना २६ जानेवारी २०१९ ला खोकल्याचा त्रास जाणवत होता. तीन दिवसापासून खोकला जात नसल्याने त्यांनी त्रिकोणी बागेजवळील द्वारका क्लिनिकमधील डॉ.पद्मनाभ पाटील यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली. यावेळी डॉ. पाटील यांनी त्यांना अ‍ॅझीथ्रो २५० एमजी (सहा गोळ्या) व रेफी कोल्ड (सहा गोळ्या) ही औषधी लिहून दिली. ही चिठ्ठी घेऊन रूग्ण शालीकराम हे गजानन मेडिकलचालक किशोर श्रीकिसन लाखोटे यांच्याकडे गेले. त्यांनी पहिली गोळी बरोबर दिली. मात्र, दुसरी डॉक्टरांनी न लिहून दिलेली सिनोडेक कोल्ड ही गोळीही दिली. या गोळ्या सेवन केल्याने त्याचा दुष्परिणाम होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा २७ जानेवारी २०१९ ला मृत्यू झाला.याप्रकरणी शालीकराम यांच्या पत्नी विद्या महाजन यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलीस ठाण्यात डॉ. पद्मनाभ पाटील व मेडिकलचालक किशोर किशोर लखोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डॉ. पाटील हे बीएएमएस डॉक्टर असून, त्यांनी आयुर्वेदिक गोळ्या लिहून देण्याऐवजी अ‍ॅलॉपॅथीची औषधे लिहून त्या गोळ्या सेवन करण्याचा सल्ला दिला. तसेच औषधी चालकानेही चुकीची गोळी दिल्याने दोघांच्या हलगर्जीपणाने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत विद्या महाजन यांनी याप्रकरणी आठ महिन्यांपासून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, विच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पडताळणी करून हा अहवाल जिल्हा वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवण्यात आला होता. या अहवालावरून वैद्यकीय अधिकारी यांनी निष्कर्ष काढला. त्यावरून चुकीचे औषध सेवन केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. अमळनेर पोलीस स्टेशनला संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदशनखाली प्रभाकर पाटील करीत आहेत.