शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या निर्बंधांमुळे मालवाहतुकीत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वेळेचे बंधने घालण्यात आली आहे. या सोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वेळेचे बंधने घालण्यात आली आहे. या सोबतच आता मालवाहतुकीच्या वाहनांना देखील ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने मालाच्या आवक-जावक वर परिणाम होत आहे. इतकेच नव्हे जळगावातील औद्योगिक वसाहतीमधून इतर ठिकाणी जाणाऱ्या मालासह किराणा साहित्याच्या आवक-जावकवरदेखील परिणाम होऊन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला व तेव्हापासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात ब्रेक द चेन लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळांनादेखील बंधने घालून ही दुकाने केवळ सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. दुकानांना वेळेचे बंधने असताना आता मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनादेखील ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जळगावातील व्यापार मोठा असून या ठिकाणाहून मराठवाडा, विदर्भामध्ये देखील माल जातो‌ तसेच सध्या धान्य खरेदीचा काळा असल्याने जिल्ह्यातील विविध भागासह मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या भागातून धान्याची आवक होत असते. मात्र मालवाहतुकीचे वाहने सकाळी ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने या सर्वांचा परिणाम होत असल्याचे व्यापारी, वाहतूक संघटनांच्यावतीने सांगण्यात आले. यासोबतच जळगावातील पाईप, डाळ या उद्योगांच्या व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विविध वस्तूंचे उत्पादन झाल्यानंतर त्यांच्या वाहतुकीवरदेखील परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात आले. सध्या साडेतीनशे टन डाळीचे दररोज उत्पादन होत असून ती वाहनांद्वारे इतर पाठविली जाते. तसेच सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने यासाठी विविध भागात पाईप पाठविले जातात. मात्र यामध्ये वाहतुकीला अटकाव केला जात असल्याने अडथळे येत आहे.

या सर्व प्रकारामुळे मालाचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालवाहतुकीस दिवसभर परवानगी असावी, अशी मागणी जळगाव जिल्हा मोटर ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याविषयी दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांची स्वाक्षरी आहे.