शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:39 IST

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

जळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरूप्रकाश आंबेडकर : मनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डावजळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारण