शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

संख्यात्मक स्क्रीप्ट वाढल्या, मात्र गुणात्मकतेचा -हास, जळगावात सेन्सॉर बोर्ड सदस्यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:42 IST

लेखनाच्या दर्जावर बोर्ड समाधानी नसल्याचा पत्रपरिषदेत उमटला सूर

ठळक मुद्देविनोदी मालिकांवर नियंत्रण गरजेचेतरुणांच्या प्रश्नांवर नाटकांची निर्मिती व्हावी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24-  आज मोठय़ा प्रमाणात नाटय़ लेखन होत आहे व त्याच प्रमाणात त्याचे सादरीकरणही होत आहे. यात संख्यात्मक स्क्रीप्ट वाढल्या असल्या तरी गुणात्मक स्क्रीप्ट त्या प्रमाणात येत नसल्याचा सूर रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) सदस्यांसोबतच्या पत्रपरिषदेतून उमटला. इतकेच नव्हे लेखनाच्या दर्जावर बोर्ड समाधानी नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. तर दुसरीकडे आजच्या स्क्रीप्टचे आजच मूल्यमापन करणे योग्य नाही, असेही काही जणांनी सांगितले. 

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) सदस्यांचा स्थानिक कलावंतांशी संवाद झाल्यानंतर पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा सूर उमटला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. 

प्रसिद्धीचा उद्देश ठेवूनच वादाचे मुद्देसध्या पद्मावत चित्रपटासंदर्भात जो वाद सुरू आहे, त्याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंडळाचे सदस्यांनी स्पष्ट केले की, नाटकाची स्क्रीप्ट अगोदर पाहिली जाते, मात्र चित्रपटाचे तसे नसते. त्यामुळे वाद उद्भवतात. कदाचित चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा उद्देश ठेवूनच अनेक दिग्दर्शकांकडून असे वादाचे प्रसंगांचा समावेश केला जातो, असे सदस्यांनी सांगितले. 

लहान मुलांचा विचार करून बालनाटय़ाची निर्मिती व्हावीबालनाटय़ामध्ये शिवीचा वापर होण्याबाबत विचारले असता सदस्य म्हणाले की, लहान मुले कोणते नाटक पाहतात, हे महत्त्वाचे आहे. त्यांचा विचार डोळ्य़ासमोर ठेवून नाटकाची स्क्रीप्ट असावी. यात वादग्रस्त प्रसंग मंडलाने कापले व सादरीकरणात ते आले तर त्याला मंडळ काही करू शकत नाही, मात्र यात प्रेक्षकही नाटकांचा अविभाज्य घटक असल्याने तो यावर आक्षेप घेऊ शकतो, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

तरुणांच्या प्रश्नांवर नाटकांची निर्मिती व्हावीसध्या कोणत्या नाटकांची निर्मिती व्हावी यावर बोलताना सांगण्यात आले की, सध्या तरुणांच्या प्रश्नांवर नाटकांची निर्मिती तर व्हावीच व ते व्यावसायिकरित्या घराघरात पोहचले पाहिजे. सध्या सोशल मीडियाचा धुमाकूळ वाढला असून यावर भाष्य होणे आवश्यक असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

गुणात्मक दर्जा वाढावा25 ते 30 वर्षापूर्वीचे व आजच्या नाटय़ांची तुलना सांगताना आज संख्या वाढली असली तरी कानिटकर, शिरवाडकर यांच्या नाटकाचा दर्जा आज येत नाही. एकूणच गुणात्मक दर्जा वाढणे आवश्यक असल्याचा सूर या वेळी उमटला. विनोदी मालिकांवर नियंत्रण गरजेचेसध्या दूरचित्रवाणीवर सादर होणा:या विनोदी मालिकांमधून मोठय़ा प्रमाणात बिभस्त संवाद वाढत असल्याबद्दल विचारले असता, हा प्रश्न गंभीर होत असून यावर नियंत्रण येणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष अरुण नलावडे यांच्यासह सदस्यांनी सांगितले. यासाठीदेखील सेन्सॉर असावे तसेच सरकारनेदेखील यावर लक्ष देऊन नियंत्रण आणावे, अशी मागणीच या वेळी सदस्यांनी मांडली.