संख्या समाधानकारक
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची नियमित समाेर येणारी संख्याही समाधानकारक असल्याचे चित्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून समोर येत आहे. गुरुवारी तर उच्चांकी ११४४ रुग्णांना बरे झाल्यानंतर कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. यात जळगाव शहरातील ३१९ रुग्णांचा समावेश आहे.
एक डॉक्टर रुजू
जळगाव : प्रतिनियुक्तीवरील उर्वरित १० डॉक्टरांपैकी औरंगाबाद येथील शल्यक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सैय्यद फैय्याज अली हे दोन दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. मात्र, अद्यापही नऊ डॉक्टर रुजू झालेले नाहीत. काही दिवसांसाठी त्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश होते. मात्र, तरीही हे डॉक्टर रुजू झालेले नाहीत.
जिल्हा परिषदेत उपस्थितीची बंधने
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग बघता जिल्हा परिषदेत ५० टक्केच उपस्थितीचे आदेश काढण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात जिल्हा परिषदेत सर्वाधिक कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव झाला होता. अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. काही विभाग तर काही दिवस बंदच होते.