शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने पार केले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 19:45 IST

तालुक्यात दोन बळी

एरंडोल: गेल्या तीन आठवड्यांमध्ये एरंडोल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. पैकी २२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह केसेस २७ आहेत. एरंडोल कोविंड केअर सेंटरमध्ये १५ रुग्णांवर उपचार होत आहे. तर जळगाव केअर सेंटर मध्ये ११ जण दाखल आहेत. तसेच १ रुग्ण नाशिक येथे उपचार घेत आहे.रविवारी तालुक्यात नव्याने ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात एरंडोल येथील जोरी गल्लीतील १६ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय पुरुष, व ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात फरकांडे येथे ३३ वर्षीय महिला ,३६ वर्षीय महिला हे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय अंतुर्ली येथे ५६ वर्षीय महिलाव ३० वर्षीय महिला हे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.दरम्यान रविवारी एरंडोल कोविंड केअर सेंटर मधून ७ पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे नसल्यामुळे दहाव्या दिवशी यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार अर्चना खेतमाळीस , डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील , डॉ. रोहित वाणी, डॉ. राकेश झोपे आदींनी त्यांना गुलाब पुष्प देऊन निरोप दिला.