शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा ! 'कुलगुरू शोध समिती' गठीत होण्‍याची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी सदस्याचे नाव कळविल्यानंतही अद्याप ''कुलगुरू शोध समिती' गठीत झालेली नाही. त्यामुळे राजभवनात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी सदस्याचे नाव कळविल्यानंतही अद्याप ''कुलगुरू शोध समिती' गठीत झालेली नाही. त्यामुळे राजभवनात समिती स्थापन करण्यासाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, ही समिती कधी गठीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कार्यकाळ संपण्यापूर्वी प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सद्य:स्थितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी आहे. दोन आठवड्यांपूर्वी कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेसाठीच्या हालचालींना सुरुवात झाली होती. ८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत 'कुलगुरू शोध समिती' साठी सदस्य म्हणून खडगपूर आयआयटीचे प्रा. डॉ. वीरेंद्र तिवारी यांच्या नावाची निवड केली होती. नंतर हे नाव कुलपती कार्यालयास कळविण्‍यात आले होते. दरम्यान, या प्रक्रियेला आता दहा ते पंधरा दिवस झाले आहे. मात्र, राजभवनातून समितीच्या अध्‍यक्षासाठी अद्याप कुठलीही हालचाल सुरू नाही. सध्‍या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ सुद्धा बंद आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर देखील जाण्याची शक्यता वर्तविण्‍यात येत आहे.

समितीचे अध्‍यक्ष असतील निवृत्त न्यायाधीश

'कुलगुरू शोध समिती'च्या अध्‍यक्षपदी निवृत्त न्यायाधीश असतील. त्यांची निवड कुलपती करतील. दरम्यान, ही निवड होऊन समिती कधी गठीत होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्‍या विद्यापीठात प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे.

अशी होईल निवड

कुलगुरू शोध समिती गठीत झाल्यानंतर आधी तिच्या कामास सुरुवात होईल. नंतर विद्यापीठ प्रतिनिधीची निवड होईल. हा प्रतिनिधी समितीला विद्यापीठातील संपूर्ण माहिती देण्‍याचे काम करेल. तसेच समितीत कुलगुरू निवडीसाठीचे निकष, पात्रता आणि इतर बाबी निर्धारित होतील. तसेच विद्यापीठाला कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रकाशित करावी लागणार आहे. समितीकडे आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम पाच संभावित कुलगुरूंची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर कुलपती स्वत: त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू निवडीची घोषणा करतील.