शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता पक्ष्यांसाठी ‘ज्यूस सेंटर’, ‘चातक’चा राबवणार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:00 IST

वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था पक्ष्यांसाठी ‘ज्युस सेंटर’ हा उपक्रम राबविणार आहे

ठळक मुद्देचला लावूया ‘पक्ष्यांचे ज्युस सेंटर’ही झाडे ठरणार महत्त्वाची : पळस, पांगारा, काटेसावर

संकेत पाटीलखिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था पक्ष्यांसाठी ‘ज्युस सेंटर’ हा उपक्रम राबविणार आहे. यात पळस, पांगारा व काटेसावर या वृक्षांचे रोपण करणे अपेक्षित आहे.प्रत्येक जण आपापल्या सोयीने व आवडीने अन्न पदार्थ जेवताना घेत असतो वा बनवत असतो. मात्र पशु-पक्षी आपल्या आवडी निवडीचे अन्न कसे उपलब्ध करणार? तुम्ही पक्ष्यांची दाणा-पाणी, तसेच कृत्रिम घरटे तयार करून त्यांची काळजी घेतातच पण आता त्यांना नैसर्गिक खाद्य कसे मिळेल याचा विचार करून आणि कृती करणे गरजेचे आहे. मानवाला जसा प्रत्येक कृतीमध्ये वेगवेगळा आहार पाहिजे असतो त्याचप्रमाणे पक्ष्यांनाही वेगवेगळा आहार हवा असतो. उन्हाळात आपल्या शरीरातील पाणी व इतर मिनरलचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी आपण ज्युस पितो तसेच पक्ष्यांना पण मधुरसाची आवश्यकता असते. जे विविध झाडांच्या फुलांमधून पूर्ण करतात. जसे काटेसावर, पळस व पांगरा या झाडांच्या फुलांमधील मधुरस पक्ष्यांना व कीटकांनाही आवडतो. उन्हाळ्यात या झाडांवर पक्ष्यांचा मेळा भरलेला असतो. काही पक्षी फक्त मधुरस पिण्यासाठी येतात तर काही या फुलांवर येणारे कीटक खाण्यासाठी येतात. ही झाडे म्हणजे एकप्रकारे पक्ष्यांचे ज्युस सेंटर आहे.पण वाढत्या या सिमेंटच्या वा क्राँक्रिटच्या जंगलातही झाडं कमी होत आहे. या पावसाळ्यातही पक्ष्यांसाठी ज्युस सेंटर लावण्याचा संकल्प चातक निसर्ग संरक्षण संस्थेने केला आहे. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या भागातील मोकळ्या जागेत, गार्डन, मंदिर व शाळा-कॉलेजमध्ये घराजवळ, परसबागेत, काटेसावर, पळस व पांगरा झाडे लावण्यास सहकार्य करा, असे आवाहन चातक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.पक्ष्यांसाठी ज्यूस सेंटरच्या उपक्रमाची संकल्पना अकोला येथील पक्षीमित्र अमोल सावंत मांडली आहे. उपक्रम यशस्वीपणे राबवला असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.आपण या उपक्रमात सहभागी होऊन झाडे लावा व झाडांचे पालकत्व घ्या व पक्ष्यांसाठी उघडा एक ज्युस सेंटर, मग तुमच्या परिसरातच दिसेल तुम्हाला पक्ष्यांची विविधता नक्कीच बघायला मिळेल.-अनिल महाजन, पक्षी अभ्यासक, अध्यक्ष, चातक निसर्ग संवर्धन संस्था 

टॅग्स :Natureनिसर्गRaverरावेर