शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आता शनिवार होणार ‘सायकल डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:06 IST

वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे.

ठळक मुद्दे१५ आॅगस्टपासून अंमलबजावणीभुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम

भुसावळ : वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे. शनिवारी शहरात कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दुचाकी-चारचाकी व इतर कुठल्याही वाहनांचा वापर न करता, सायकलचा वापर करणे हे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे असेही आवाहन करण्यात आले आहे की सध्या अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर जावे.लहान मुले सायकल सहज व आनंदाने चालवतात. परंतु महाविद्यालयीन जीवनापासून नागरिक सायकलपासून कायमचे लांब होतात. कित्येकांना तर अशी भीती असते की, लहानपणी सहज कित्येक किलोमीटरपर्यंत फिरणारी सायकल आता आपल्याला जमेल की नाह. परंतु सायकलींग, घोडेस्वारी व पोहणे या तीनही कला मनुष्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत असतात. गरज असते ती फक्त धैर्याची व सरावाची.तसं पाहिल्यास सायकलने शहरात प्रवास करणे सहजशक्य आहे. त्याचे फायदेदेखील अनेक आहेत. शहरातील अरुंद व अधिक रहदारीच्या रस्त्यांवर सायकलचा प्रवास सहज व वेळ वाचविणारा तसेच आनंददायी होय. शिवाय प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सायकल हा पर्याय सर्वोत्तम आहे. त्यामुळे जगातील असंख्य शहरात आठ ते दहा किलोमीटरसाठी नागरिक सायकल वापरतात. शिवाय सायकलिंगमुळे शहरात जाणवणारी पार्किंगची समस्यादेखील काही प्रमाणात कमी होईल.सायकल एक उत्तम पर्याय आहे. नियमित वापरामुळे आपणास रात्री शांत झोप लागू शकते. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या अभियानात शहरातील खासगी तसेच सरकारी कार्यालये, विविध संघटना व समस्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्यास मदत करावी, असे आवाहन प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील व प्रवीण पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीBhusawalभुसावळ