शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

आता हे शेतकऱ्यांचे कैवारी की वैरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:32 IST

एकीकडे योगदानाचे कौतुक करीत असताना दुसरीकडे खच्चीकरण, एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात केंद्र व राज्य सरकार व्यग्र, विमा, मका खरेदीतून शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी, कंपन्यांचे उखळ पांढरे

मिलिंद कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही शीर्षस्थ नेते नेहमी शेतकºयांच्या योगदानाचा अभिमानपूर्वक उल्लेख करीत असतात. अगदी कोरोना काळातसुद्धा सगळीकडे लॉकडाऊनची स्थिती असताना बळीराजा मात्र खरीप हंगामावर लक्ष केंद्रित करीत आहे. यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. असे असताना केंद्र व राज्य सरकार शेतकºयांच्या हिताच्या योजना राबविताना त्याच्यावर अन्याय होईल आणि व्यापारी, व्यावसायिक कंपन्या यांचे उखळ पांढरे होईल, असा निर्णय का घेतात? सरकार कोणाचेही असो, पक्ष कोणताही असो, शेतकºयांचे अहित पाहण्याचे धोरण वर्षानुवर्षे तेच आहे.शेतकºयांशी निगडित अलिकडचे चार प्रमुख विषय घेतले तरी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी कसे आहे, हे स्पष्ट होते. पहिले उदाहरण हे सदोष सोयाबिन बियाण्याचे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात सोयाबिन बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. राज्य सरकारने आता चौकशीचा फार्स चालवला आहे. इतर व्यवसाय आणि शेती व्यवसाय यातील फरक लक्षात घ्यायला हवा. बोगस बियाण्याची भरपाई मिळेल तेव्हा मिळेल, पण हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकºयाला दुसरे बियाणे पुन्हा विकत घ्यावे लागलेच. पेरणीसाठी दुसºयांदा श्रम व मोल लागलेच. मनस्ताप झाला, तो वेगळाच.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की, उत्पादकाला त्याचा भाव ठरविण्याची संधी नाही. चार-सहा महिने कष्ट तो करतो आणि कमाई मात्र व्यापाºयाची होते. व्यापाºयाची नियत चांगली असेल तर ठीक, अन्यथा तिथेही फसवणूक झाली, तर शेतकरी देशोधडीला लागतो. गेल्या आठवड्यात कापूस व्यापाºयांनी फसविल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. गेल्या आठवड्यात झालेले दूध आंदोलन हे शेतकºयाच्या दयनीय स्थितीचे बोलके उदाहरण आहे. शेतकºयाकडून सहकारी दूध संघ विकत घेतो तो दर आणि ग्राहकाला विकतो तो दर यात केवढा फरक आहे. दळणवळण, प्रक्रिया असा खर्च गृहित धरला तरी केवढी लूट सुरू आहे, हे स्पष्ट होते. तीच स्थिती कापूस व मका खरेदीची आहे. गेल्यावर्षीचा कापूस शेतकºयाच्या घरात पडून आहे. मक्याची तीच स्थिती आहे. आठवड्याची मुदतवाढ देताना केंद्र सरकारने अडीच लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात १० लाख क्विंटल मका शेतकºयाच्या घरात पडून आहे. राज्यात २५ लाख क्विंटल मका पडून असल्याचा अंदाज आहे. शेतकºयाची केवढी थट्टा?हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा गाजावाजा करीत असताना केळी व डाळिंबाच्या निकषात बेमालूमपणे बदल केला आहे. हा बदल शेतकºयापेक्षा विमा कंपनीचा फायदा बघणारा आहे. उन्हाळा, हिवाळा आणि वादळी वाºयाच्या काळात होणारे पिकांचे नुकसान लक्षात घेऊन ही विमा योजना राबविण्यात आली. मात्र गेल्या वर्षापेक्षा यंदा निकषात खूप मोठे बदल करण्यात आले. थंडी किंवा ऊन हे सलग ३ ते ५ दिवस सारखे राहण्याची अट आता ५ ते १४ दिवसांपर्यंत केली आहे. नुकसान भरपाई ३३ हजार ते ६६ हजारादरम्यान होती, ती ९ ते ५० हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. अन्यायकारक निकषाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. १५ जुलैपर्यंत या समितीने अहवाल द्यायला हवा होता. पण अद्याप तो सादर झाला नाही. अहवालातील तरतुदी लक्षात घेऊन केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव पाठवला तरच योजनेच्या निकषात बदल होतील. पण सगळा आनंदीआनंद आहे.शेतकºयांचे आम्हीच खरे कैवारी असे प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो. सत्तेतील सगळेच मंत्री भूमिपुत्र असल्याचा गौरवाने उल्लेख करतात. मग शेतकºयांचे हाल त्यांना का दिसत नाही? सदोष सोयाबिनचे बियाणे कसे हाती पडते?घरात कापूस व मका पडलेला असतानानव्या हंगामाची पेरणी करणाºया शेतकºयाची मनोवस्था कुणाला कळणार आहे काय? नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर विमा योजनेतून नुकसानभरपाई मिळण्याचा हक्कदेखील हिरावला जात असताना त्याने काय करणे अपेक्षित आहे? स्वत:च्या उत्पादनाचा दर ठरवू शकत नाही, असे एकमेव शेती क्षेत्र आहे. तरीही सगळे स्वत:ला कैवारी म्हणवतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव