शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आता ग्राहक पंचायतीचे जिल्हास्तरावर एक कोटींपर्यंतचे दावे चालतील- प्र. ह. दलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:38 IST

आॅनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यासुद्धा आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन खरेदीत होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्धही दावे दाखल दाखल होऊ शकतील, असे ग्राहक पंचायत, महाराष्टÑ या ग्राहक संघटनेच्या जळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देलोकमत संडे स्पेशल मुलाखतचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादआॅनलाईन कंपन्याही ग्राहक संरक्षण कायद्यात

रवींद्र मोराणकर ।भुसावळ, जि.जळगाव : आॅनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यासुद्धा आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन खरेदीत होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्धही दावे दाखल दाखल होऊ शकतील, असे ग्राहक पंचायत, महाराष्टÑ या ग्राहक संघटनेच्या जळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.देशभरात २० जुलै २०२० पासून नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला आहे. यासंदर्भात ते आपली भूमिका मांडत होते.प्रश्न : नवीन कायद्यात नेमक्या कोणत्या सुधारणा झाल्या आहेत?जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे आता एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालू शकतील. यापूर्वी ही मर्यादा २० लाखांपर्यंत होती. राज्य आयोगाकडे १० कोटी रुपयांपर्यंत दावे चालतील.प्रश्न : आता ग्राहकांचे शोषण थांबेल?मुळीच नाही. पण त्यास काही प्रमाणात तरी प्रतिबंध मात्र निश्चित होईल. केवळ कायदे करून अन्याय निवारण किंवा शोषणमुक्ती किंवा सुधारणाही होत नसते तर ज्याच्यासाठी कायदे आहेत त्याने ते समर्थपणे वापरलेही पाहिजेत. तरच कायद्याचा हेतू सफल होतो. त्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन होणे अत्यावश्यक आहे.प्रश्न- ग्राहकांचे शोषण म्हणजे नेमके काय?ग्राहकाची अडवणूक, फसवणूक होणे म्हणजे त्याचे शोषण होणे होय. दुय्यम प्रतीची वस्तू मिळणे, अवाजवी किंमत आकारणे, वजन मापात लुबाडणे, बिल न देणे, भेसळ मिळणे, कालबाह्य तारखेत खाडाखोड करणे या वा अन्य मार्गाने ग्राहकाला फसविणे, नाडणे म्हणजे त्याचे शोषण होय.प्रश्न- हा कायदा कधी अस्तित्वात आला?ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी २४ डिसेंबर १९८६ रोजी हा कायदा अस्तित्वात आला. १२ जानेवारी १९७४ रोजी पुण्यात कै.बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची स्थापना केली. ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रणेतेही तेच आहेत. या कायद्यामुळेच ग्राहकांना काही हक्क प्राप्त झाले.ग्राहकाभिमुखया कायद्यामुळेच ग्राहकांना काही हक्क प्राप्त झाले. ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना झाली. अभ्यासक्रमात ग्राहक संरक्षण विषयाचा समावेश झाला. सोप्या पद्धतीने ९० दिवसात ग्राहकाला न्याय देण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक मंचही (कोर्ट) निर्माण झाले.ग्राहक पंचायतीची त्रिसूत्रीउत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम ही ग्राहक पंचायतीची त्रिसूत्री आहे. ही चळवळ स्वस्त किमतीसाठी नाही तर वस्तू प्रमाणित व योग्य किमतीत मिळाव्यात म्हणून आहे. संघटनेचा लढा व्यापारी वर्गाविरुद्ध नाही, तर अनुचित व्यापारी प्रथांविरुद्ध आहे.ग्राहक सेलग्राहक मेडिकेशन सेलची स्थापना हे आणखी एक या कायद्याचे वैशिष्ट्य सांगता येईल.तोडफोड नव्हेग्राहकांनी देशासाठी चालविलेली ग्राहकांची चळवळ म्हणजे ग्राहक पंचायत होय. कायदेभंग बंद, जला दो, फेक दो तोड दो हे ग्राहक पंचायतीला मान्य नाही, असेही प्र.ह.दलाल यांनी शेवटी मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :consumerग्राहकBhusawalभुसावळ