शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आता भुसावळात भाजपला पडणार खिंडार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

भुसावळ : जळगाव महापालिकेत दोन महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत ५७ पैकी २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने ...

भुसावळ : जळगाव महापालिकेत दोन महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत ५७ पैकी २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने सत्ता मिळविली होती. यानंतर दोन-चार दिवसांपूर्वी मुक्ताईनगर पालिकेतही भाजपचे नगरसेवक शिवसेनेने गळाला लावले व सद्य:स्थितीला जळगाव महापालिकेत भाजपच्या उर्वरित ३० पैकी आणखी ३ नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले गेले. आता जळगाव मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधत भाजपचे काही पदाधिकारी व नगरसेवक नजीकच्या काळामध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय मंडळींमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी जाहीररीत्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे पदावर आहेत ते फक्त औपचारिक असल्याचे दिसून येत आहे. अर्धे भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेले, तर भुसावळचे उरलेले काही नगरसेवक हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून नजीकच्या काळामध्ये शिवबंधन बांधणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.

येत्या सहा महिन्यांत नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी पक्षासोबत गेल्यास नक्कीच शहरातील विकास कामे मार्गी लागतील, असा हेतू यामागे दिसून येत आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही भुसावळकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, रस्ते असो की अमृत योजना आदी प्रत्येक कामाकडे जातीने लक्ष देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

जळगाव मुक्ताईनगरनंतर आता भुसावळ भाजपला खिंडार पडणार असून, कोणते दिग्गज चेहरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे नजीकच्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.